#KonkanRains आंबोली घाटात दरड कोसळली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली. 

आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली. 

झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर पडली. ठिकठिकाणी माती व झाडे दगड अशी पडझड पहावयास मिळाली. काही ठिकाणी आणखी झाडे पडण्याच्या स्थितीत आहे. ही दरड सकाळी दहा वाजता कोसळली, येथील पेट्रोलिंग करणारे पोलिस हवालदार गुरुदास तेली आणि राजेश देसाई हे चारचाकी पोलीस व्हॅनने जात असताना मागच्या बाजूला झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दरडीमुळे काही प्रवासी अडकून पडले होते.

बेळगाव रस्त्यावरून चार दिवस वाहतूक बंद आहे. अर्ध्यापर्यंत बस जातात. येथे गेले 6 दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे तसेच 6 दिवस वीज नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पर्यटकांनीही आंबोलीकडे पाठ फिरवली. मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम जाणवत आहे.

आंबोली, चौकूळ, गेळे येथे गेली 6 दिवस वीज नाही त्यामुळे मोबाईल बॅटरी उतरून संपर्क नाही. शिवाय विजेशिवाय अनेकांची मुश्‍किल झाली. पर्यटन थंडावले. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे पाऊस जाण्याची वाट येथील लोक बघत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains Landslide in Amboli Ghat