esakal | Kokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळीत
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळीत

Kokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळीत

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णै : मुसळधार पावसामुळे (heavy rain) हर्णै, पाळंदे, मुरुड गावांतील (murud) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. गेले दोन दिवसात पावसाचे प्रमाण तसे कमी होते. परंतु मंगळवारी (15) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरा हर्णै लोखंडीमोहल्ला येथील रफिक बुरोंडकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे त्यांचे यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान झाले.

मेमन कॉलनी, बंदरमोहल्ला या ठिकाणी घराच्या दारापर्यंत पाणी आले होते. हर्णैमधील मुख्य रस्त्यावरील शिवाजी चौकातून ब्राह्मणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणी तुंबले होते. येथील नाल्यामध्ये कचरा अडकल्याने येथे पाणी तुंबले होते. वाहतुकीला रस्ता बंदच झाला होता. नाथद्वारनगरमध्ये देखील पाणीच पाणी झाले होते. नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी आले होते.

हेही वाचा: 'अनिल परबांच्या मिळकतीत प्रॉपर्टीचा उल्लेख नाही'

पाळंदेमध्ये मुख्य रस्त्याला लागूनच एका विकासकाने डोंगर पोखरायचे काम सुरू केले आहे. सध्या पाऊस असल्याने हे काम थांबले आहे. या डोंगरावरील माती या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर व समोर रस्त्याच्या विरुद्ध बाजूस राहणाऱ्या घरासमोरील अंगणात वाहून आली होती. दरम्यान, मुरुडमध्ये देखील खूपच पाणीपाणी झाले होते. सर्व पाखाड्यांना मोठमोठ्या ओढ्यांचे स्वरूप आले होते. मुरुडमधून कर्दे गावाकडे जाणाऱ्या तिठ्यावर माती वाहून आली होती. सकाळपासून हर्णै ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी गावातील सर्व ठिकाणची पाहणी करून जेथे शक्य होईल अशा ठिकाणी मदतकार्य देखील करत होते.

"गेले 15 दिवस सातत्याने नाल्यांची साफसफाई करून सुद्धा काही ठिकाणी पाणी तुंबले आहे. याचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल."

- ऐश्वर्या धाडवे, सरपंच, हर्णै

हेही वाचा: Kokan Rain : सिंधुदुर्गात पाणीच पाणी, किनारपट्टीवर मुसळधार

loading image