
Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्रातही वादळी स्थिती आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. महावितरणच्या वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, हवामान विभागाने उद्या (ता.२७) पर्यंत ४.८ मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.