Kotheri Dam : पुनर्वसनात रखडले धरण

महाडमधील ‘कोथेरी’साठी १२० कोटींची सुधारित मान्यता
Kotheri Dam issue 120 crore revised approval for Kotheri dam in Mahad
Kotheri Dam issue 120 crore revised approval for Kotheri dam in Mahadsakal

महाड : अनेक वर्षे रखडलेल्या तालुक्यातील कोथेरी धरणाला २०१९ मध्ये १२० कोटी रुपयांची सुधारित मान्यता मिळाली, मात्र पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्‍याने धरणाचे काम रखडले आहे. महाड शहरासह अकरा गावांना उपयुक्त असणाऱ्या या धरणाचा प्रस्‍तावाला २००६ मध्ये मंजुरी मिळाली होती.

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोथेरी गावात स्थानिक नदीवर जलसंपदा विभागाकडून मातीचे धरण बांधले जात आहे. २००६ च्या सुमारास तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन करण्यात आले, परंतु अपुऱ्या निधीमुळे धरणाचे काम रखडले. दरम्‍यान धरणाचा कामाचा खर्च वाढल्‍याने काम पूर्णतः ठप्प झाले.

धरणामुळे २१० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यासाठी तीन ठिकाणी जागा निश्चित केल्या असून सोमजाई व मूळ गावातील पुनर्वसनाचा प्रश्न सुटला आहे. परंतु उर्वरित ८७ कुटुंबांने शिरगाव गावठाणात पुनर्वसन केले जावे, अशी मागणी केली. कोथेरी धरणामुळे परिसरातील जवळपास ५४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या सिंचनाचा लाभ कोथेरी, कोल, शिरगाव, चोचिंदे, मुठवली, दादली, किंजळघर, वडवली, कोंडीवते, राजेवाडी, कांबळे या ११ गावांना होईल. धरणातील पाणी महाड शहरासाठी राखीव ठेवले जाणार असल्याने हे धरण महाडकरांसाठीही उपयुक्त ठरेल.

साठवण क्षमता

कोथरी धरण मातीचे असून उंची ३३.९२ मीटर तर लांबी ४५० मीटर इतकी आहे. पाणी साठा क्षमता ८.८० दश लक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा ८.२२ दश लक्ष घनमीटर एवढा आहे.

कोथेरी धरणाला सुधारित प्रकल्प म्‍हणून मान्यता यापूर्वीच मिळाली आहे. मात्र बाधित होणाऱ्या ८७ कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्यानंतर धरणाचे काम सुरू केले जाईल.

- मंदार गाडगीळ, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग, महाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com