Koyana Project Anniversary : प. महाराष्ट्राची जीवनदायनी असणाऱ्या कोयना प्रकल्पाचा आज ६१ वा बड्डे!

कोयना प्रकल्पाचा मंगळवारी (ता. १६) ६१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्राला गरजेच्या काळात अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याची किमया या प्रकल्पाने केली आहे.
Koyana Dam
Koyana DamSakal
Summary

कोयना प्रकल्पाचा मंगळवारी (ता. १६) ६१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्राला गरजेच्या काळात अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याची किमया या प्रकल्पाने केली आहे.

चिपळूण - कोयना प्रकल्पाचा मंगळवारी (ता. १६) ६१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्राला गरजेच्या काळात अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याची किमया या प्रकल्पाने केली आहे. महत्त्वाकांक्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राला विजेचा झगमगाट देताना, औद्योगिकरणाला मोठी साथ केली तर कृष्णा, कोयनाकाठ जलसमृद्ध करताना लगतच्या दुष्काळी प्रदेशाचीही तहान भागवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प १६ मे १९६२ ला कार्यान्वित झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच कोयना प्रकल्पाच्या उभारणीचा श्रीगणेशा झाला. धरणाच्या बांधकामास १ मार्च १९५८ ला प्रारंभ होऊन हा प्रकल्प १६ मे १९६२ ला कार्यान्वित झाला. कोयना धरणाच्या जलाशयात जगातील सर्वात मोठी व आशिया खंडातील दुसरी जलाशय छेद प्रक्रिया (लेक टॅपिंग) २५ एप्रिल २०१२ ला यशस्वीरीत्या पार पडली.

धरणाची पाणी वापर क्षमता जवळपास २० टीमएसीने वाढली. अभियांत्रिकीच्यादृष्टीने हा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग होता. पहिल्या ‘लेकटॅपिंग’नंतर कोयनेची वीजनिमिर्ती क्षमता एक हजार मेगावॅटने वाढली. दुसऱ्या ‘लेकटॅपिंग’नंतर धरणाच्या अगदी तळापर्यंतचे शिल्लक राहणारे पाणी वापरायला उपलब्ध झाले. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पावसाळ्यात क्षमतेच्या दुप्पट ते अडीचपट पाणी धरणात येऊनही त्याचे नियंत्रण करण्यात अनेकदा यश आले आहे.

धरणाच्या भिंतीचे मजबुतीकरण

११ डिसेंबर १९६७ ला झालेल्या प्रलयकारी भूकंपाने सह्याद्री हादरला; मात्र ही भीषण आपत्ती कोयना धरणाने पेलली. या भूकंपाने जमिनी भेगाळल्या. सव्वाशेजणांचे जीव गेले. बऱ्याच काळापर्यंत या भूकंपाची भीती सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात व्यक्त होत राहिली. यापूर्वी आणि यानंतरही या परिसराने व कोयना प्रकल्पाने भूकंपाचे लक्षावधी धक्के पचवले. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाने धरणाच्या भिंतीच्या मजबुतीकरणाचे कामही पूर्णत्वाला गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com