Koyna Dam: धोक्याची घंटा! कोयनेत पाणी संकट, फक्त पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; अपुऱ्या पावसाचा फटका

Koyna Dam Faces Severe Water Crisis: अपुऱ्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून सिंचनासाठी पाणी सोडणे थांबवण्यात आले आहे.
Koyna Dam

Koyna Dam

esakal

Updated on

चिपळूण: कोयना धरणातील पाणीटंचाईने यंदा भीषण रूप धारण केले आहे. नवीन जलवर्षाची सुरुवात होऊन दीड महिना उलटला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने केवळ सिंचनाचाच नव्हे तर राज्याच्या जलविद्युत निर्मितीचाही श्वास कोंडला गेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच धरणातून सिंचनाचे पाणी बंद करून केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली आहे, ही धोक्याची घंटा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com