Koyna Dam low water level news
esakal
चिपळूण : कोयना धरणातील पाणी पातळी खालावल्याने धरणातील पाणीसाठा अवघ्या १२.०४ टीएमसीवर आला (Koyna Dam low water level news) आहे. वीजनिर्मिती करणाऱ्या ‘महाजनको’चा शिल्लक कोटाही दोन दिवस पुरेल इतकाच केवळ ०.५८ टीएमसी असल्याने एक जूननंतर महाजनकोला वीजनिर्मिती बंद करावी लागण्याची भीती आहे. यामुळे वीजनिर्मितीसह सिंचनांचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.