esakal | क्रेनने मोटार, दुचाकीला उडवले ; एकजण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

krane two wheeler and four wheeler accident one person dead in ratnagiri

शहर पोलिस ठाण्यात अपघातची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू होती. 

क्रेनने मोटार, दुचाकीला उडवले ; एकजण जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील परटवणे ते फिनोलेक्‍स कॉलनी दरम्यानच्या रस्त्यावर क्रेन, दुचाकी आणि मोटार यांच्यात विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच जागीच ठार झाला असून क्रेनही पलटी झाली. त्यानंतर मात्र क्रेन चालक फरार झाला. शहर पोलिस ठाण्यात अपघातची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू होती. 

प्रकाश विलास गोसावी (वय ३२, रा. जांभूळफाटा-मजगावरोड, रत्नागिरी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दुपारी अडीच्या सुमारास घडली. गोसावी हा दुचाकी (क्र. एमएच-०८ यू २७९६) घेऊन जांभूळफाटा ते परटवणे असा येत होता. परटवणेहून येणाऱ्या क्रेनने फिनोलेक्‍स कॉलनीसमोरील उतार व छोट्या पुलानजीक प्रथम मोटारीला व दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटार बाजूला गेली व स्वार दुचाकीसह पुलाच्या खाली वाहाळात फेकला गेला.

हेही वाचा - कायद्याची जाणीव जागविणारे म्युझियम 

त्यामध्ये त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात क्रेन रस्त्याच्या कडेला उलटली तर मोटारीचेही नुकसान झाले. या तिहेरी अपघातातील क्रेन चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. खबर मिळताच मृत स्वाराचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती.

संपादन - स्नेहल कदम 

loading image