विकासकामांमुळेच कुडाळात विजय ः वैभव नाईक 

अजय सावंत
Tuesday, 19 January 2021

याबाबत आमदार नाईक म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय शिवसेनेने संपादन केला आहे.'' 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - जनतेने आमच्यावर विश्‍वास ठेवून तालुक्‍यातील 5 ग्रामपंचायती आमच्याकडे दिल्या आहेत. हा आमचा व आम्ही केलेल्या विकासकामांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिली. 

आज जाहीर झालेल्या निकालात तालुक्‍यातील सर्वाधिक 5 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला. यामध्ये वसोली, कुसबे-पोखरण, आकेरी, गिरगाव-कुसगाव, माड्याचीवाडीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याबाबत आमदार नाईक म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय शिवसेनेने संपादन केला आहे.'' 

या वेळी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, वर्षा कुडाळकर उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे, सुशील चिंदरकर, राजू कविटकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपसभापती जयभारत पालव, श्रेया परब, सचिन काळप, दीपक आंगणे, सुशील चिंदरकर, राजू गवंडे, शेखर गावडे, मथुरा राऊळ, नितीन सावंत, रूपेश पावसकर, बाबी गुरव, शरद परब आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

या वेळी श्री. नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेना शाखेत पक्षाच्या विजयी सर्व उमेदवारांना हार घालून अभिनंदन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kudal gram panchayat election konkan sindhudurg