कुणकेश्वर यात्रेची सांगता; यंदा किनारा सुनासुना

kunkeshwar jatra devgad taluka konkan sindhudurg
kunkeshwar jatra devgad taluka konkan sindhudurg
Updated on: 

देवगड (सिंधुदुर्ग) -  तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची आज पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने सांगता झाली. दरवर्षी स्नानाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीची आठवण आज समुद्रालाही बहुदा झाली असावी. देवस्वाऱ्यांच्या पायावर लोटांगण घालण्याची संधी यंदा समुद्राला मिळाली नाही आणि असा अलौकिक सोहळा पहाण्याची भाविकांची संधीही हुकली. तीन दिवस बाहेरील व्यापारी आणि दूरच्या भाविकांविना यात्रा संपन्न झाली. 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे यात्रा भरते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव मर्यादित यात्रा होती. त्यामुळे बाहेरील व्यापारी, अन्य भाविक यात्रेकरू यांना कुणकेश्‍वरला जाता आले नाही. मंदिरातील धार्मिक विधी दरवर्षीप्रमाणेच पार पडले. कमी होती ती भाविक यात्रेकरूंची. मंदिरात यंदा शिवाचा जयघोष करणारी भजने नाहीत, हरहर महादेवचा गजर करणारे दूरवरचे भाविक यात्रेकरू नाहीत, परिसर व्यापून टाकणारे बाहेरील व्यापारी नाहीत, भेटीसाठी येणाऱ्या देवस्वाऱ्या नाहीत, छोट्या दोस्तांना मजा मस्ती करण्यासाठी खेळ नाहीत तर तरूणाईला फिरण्यासाठी यात्रा नाही.

यामुळे यात्रा परिसर सुनासुना भासत होता. यात्रा भरली नसल्याने उलाढाल झाली नाही. केवळ स्थानिकांची दुकाने होती. आज समुद्रस्नानाने यात्रेची सांगता झाली. मात्र समुद्रावर दरवर्षीप्रमाणे गजबजाट नव्हता. स्नानासाठी येणाऱ्या देवस्वाऱ्यांच्या पायावर समुद्राच्या लाटा लोळण घेत. देवस्वाऱ्यांसोबत येणारे भाविक समुद्रस्नान करीत. मात्र यंदा समुद्रालाही भाविकांच्या गर्दीची कमी जाणवली असेल. समुद्रकिनारी बंदोबस्त होता. एकूणच यंदाचा यात्रोत्सव साधेपणाने साजरा झाला. 

कोरोना दूर करण्याचे साकडे 
""देवा कुणकेश्‍वरा.... कोरोनाचे सावट दूर होऊन यात्रेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे तुझ्या प्रांगणात भाविकांचा महापूर येऊ दे. पुन्हा मोठ्या गजबजाटात यात्रा होऊ दे,'' अशी करूणा भाविकांना कुणकेश्‍वरकडे भाकली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Black panther fell into well in Umroli
Anti Corruption Bureau action
Forest Fires Damage Historic Sarasgad Fort and Wildlife
Revas-Reddi Coastal Highway latest update