कुणकेश्‍वर ग्रामस्थांचा होळीतून पर्यावरणाचा 'हा' संदेश 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

होळी उत्सवात सर्वच भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. उत्सवासाठीची पारंपारिक पध्दत असली तरी त्यातून आता नव्या पिढीसाठी मार्ग काढला जात असल्याचे दिसते. उत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असली तरी कधीतरी उत्सव साजरा करताना ही बाब अडचणीचीही ठरू शकते.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे होळी उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येत आहे. होळी उत्सवासाठी वृक्षतोड केलेल्या ग्रामस्थांना पुर्नलागवड करण्यासाठी हापूस कलमासह जांभूळ, फणस तसेच अन्य प्रकारची झाडे देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

होळी उत्सवात सर्वच भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. उत्सवासाठीची पारंपारिक पध्दत असली तरी त्यातून आता नव्या पिढीसाठी मार्ग काढला जात असल्याचे दिसते. उत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असली तरी कधीतरी उत्सव साजरा करताना ही बाब अडचणीचीही ठरू शकते. तसेच पुढील पिढीला यातून काहीतरी देता आले पाहिजे या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मोठ्या जल्लोषाने होळी उत्सवाला सुरुवात झाली. कुणकेश्वर गावाची देव होळी व गाव होळी अशा आंब्याच्या झाडाच्या होळ्या उभारण्यात आल्या. त्यांचे पूजन महाआरती तसेच नैवेद्य इत्यादी विधिवत कार्यक्रम झाले.

होळी उत्सवादरम्यान होळीच्या मांडाच्या ठिकाणी रोज रात्री कुणकेश्वरमधील ग्रामस्थ एकत्रित जमून पारंपारिकरित्या उत्सव साजरा करतात. त्यावेळी बैठकाही होतात. त्यामध्ये गावातील इतर संस्थांच्या कार्यांचा आढावा घेतला जातो. विशेषतः देवस्थानचे विकास कामांबाबत व गावातील विकास कामांबाबत चर्चा करुन सर्वानुमते महत्वाचे निर्णय घेतले जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunkeshwar Villagers Give Save Environment Message Through Holi