रसायनी रेल्वे स्टेशनात सुविधाचा अभाव 

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

रसायनी (रायगड) - रसायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच दोन दिवा पेण रेल्वेच्या लोकल फे-या सुरू करण्यात आल्या आहे. भविष्यात अजुन फे-या वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्व आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात आशी मागणी आहे. 

रसायनी रेल्वे स्टेशनात प्लाँट फँर्मावर  बसण्यासाठी बाक आणि निवारा शेड नसल्यामुळे  प्रवा़शांना ऊन्हा पावसात ताटकळत उभे रहावे लागत आहे. तसेच स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे नैसर्गिक विधिसाठी झाडाझुडपाचा आडोसा घ्यावा लागत आहे. आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.  तसेच ब-याचदा रात्रिच्या वेळेस दिवे बंद असतात. होणा-या गैरसोई मुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. तसेच प्लाँट फाँर्मवर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. जाताना भेगात लहान मुलांचा पाय अडकण्याची भिती प्रवाशी व्यक्त करत आहे. दरम्यान येथील प्रवाशांच्या समस्या कडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. 

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणि क्षेत्र बाहेर नविन कारखाने सुरू होऊ लागले आहे. तसेच मोहोपाडा व पाताळगंगा परीसरात बांधकाम व्यावसायिकांचे नवीन गृहप्रकल्पांची काम सुरू आहे. मुंबई व नवीमुंबईत नागरिक येथे घरासाठी पसंती देत आहे. त्यामुळे परीसरात गावांची लोकसंख्या वाढु लागली आहे. परिणामी प्रवाशी संख्या वाढत असल्याने येथे सुविधा मिळाव्यात आशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील व इतर प्रवाशांनी केली आहे. 

पनवेल वरून रोहा पर्यंत लोकल सुरू झाल्यास रसायनीतील  गाव भविष्यात नवीमुंबईतील उपनगर म्हणुन ओळखली जाऊ लागतील. तसेच परीसरातील गावांची आजुन लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने रसायनी रेल्वे स्टेशन मध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. 
विश्वनाथ गायकवाड, सदस्य, तुराडे ग्रामपंचायत 

Web Title: Lack of facility in rasayni station