बांदा : शक्तिपीठ महामार्गासाठीची (Shaktipeeth Highway) बांद्यातील जमीन मोजणीची प्रक्रिया आजपासून (ता. २१) सुरू होणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून (Land Records Office) बांदा शहरातील काही शेतकऱ्यांना नोटिसा प्राप्त झाल्या असून, यामध्ये २१ ते २५ मे या कालावधीत मोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना (Farmers) अद्याप नोटिसा प्राप्त न झाल्याने ते संभ्रमात आहेत.