मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात दरड कोसळली

चिपळूण (रत्नागिरी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (mumbai-goa national highway)कामथे घाटात गुरुवारी (ता. २४) दुपारच्या दरम्यान दरड रस्त्यावर कोसळली. संरक्षक भिंतीमुळे दरड किरकोळ स्वरूपाची असली तरी त्यातील तीन भलेमोठे दगड चौपदरीकरणातील नव्या रस्त्याच्या मध्यभागी येऊन थांबले. त्याचदरम्यान तेथे वाहने नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. (landslide-kamath-ghat-on-the-mumbai-goa-national-highway-kokan-news)

महामार्ग चौपदरीकरणाच्या परशुराम ते खेरशेत या ३६ कि.मी.च्या चिपळूण टप्प्यात अवघड वळणांचे परशुराम आणि कामथे घाट महत्वपूर्ण मानले जातात. यामध्ये परशुराम घाटातील काम तेथील स्थानिक आणि देवस्थान वादात थांबले आहे. मात्र, कामथे घाटातील काम सुरू आहे. चौपदरीकरणात रस्ता रुंदीकरण करताना बाजूचा डोंगर पोखरून काढण्यात आला आहे.

डोंगराची खोदाई करून रस्त्यालगत पूर्ण घाटात डोंगराच्या बाजूला संरक्षक भिंतीही उभारण्यात आल्या आहेत. मात्र, डोंगराच्या खोदाईने दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. गुरुवारी दीड वाजण्याच्या सुमारास या घाटातील एका वळणावर कोसळलेली दरड थेट चौपदरीकरणातील नव्या रस्त्यावर आली. त्यामध्ये मोठमोठ्या दगडांचा समावेश होता. माहिती मिळाल्यानंतर महामार्ग कंत्राटदार ईगल चेतक कंपनीने तत्काळ ही दरड बाजूला केली. यामुळे वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. नंतर ती पूर्ववत झाली.

१४ कुटुबांना दरडीचा धोका; सरंक्षक भिंतीची मागणी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसेलल्या कामथे खुर्द हरेकरवाडी मधील टेपवाडी येथे कामथे घाटातच रूंदीकरणासाठी डोंगर कटाई झाली. डोंगर पोखरल्याने टेपवाडीतील १४ कुटुबांना धोका आहे. डोंगराची माती महामार्गावर येऊ नये. तसेच १४ कुटुबांना दरडीचा धोका पोहोचू नये. यासाठी आम्ही सरंक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. गेल्या दोन वर्षापासून ठेकेदार कंपनी ईगल तसेच चेतक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. मात्र, कंपनीकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप सरपंच समीर बेचवडे यांनी केला आहे.

कामथेमधील ग्रामस्थ आक्रमक

जिथे माती खाली येते, तिथे सरंक्षक भिंतीचे काम सुरू नाही. जिथे माती खाली येत नाही, कडक दगड आहे, तिथे कंपनीने सरंक्षक भितींचे काम सुरू केले आहे. आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामे सुरू नसल्याने कामथेमधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com