Mumbai Goa Highway flyover wall repair latest news
esakal
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या भिंतीच्या सिमेंट काँिक्रट प्लेट्स गेल्या महिन्यात अचानक सैल होऊन बाहेर आल्या (Mumbai Goa Highway flyover wall repair latest news) होत्या. या प्रकारामुळे उड्डाणपुलाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या संतापाची दखल घेत संबंधित ठेकेदार कंपनीने पुलाच्या मजबुतीकरणासाठी ‘सॉइल नेलिंग’चे काम सुरू केले आहे.