गणपतीपुळे येथील समुद्रात बुडालेल्या तिघांचा शेवटचा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

गणपतीपुळे पोलिस चाैकीच्या मागील बाजूस समुद्रात मचले कुटुंबातील आठ लोक पोहण्यासाठी गेले होते.  त्या मधील काजल रोहन मचले (वय 17), सुमन विशाल मचले (वय 25, दोन्ही रा. कसबा बावडा कोल्हापूर मूळ राहणार हुबळी कर्नाटक) हे पाण्यात बुडुन मृत झाले आहेत. उमेश अशोक बागडे (वय 28) हा बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे.

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्रात पोहोण्यासाठी गेलेले 3 जण बुडाले. आज (ता. 17) सकाळी सव्वासात वाजता ही घटना घडली. 

गणपतीपुळे पोलिस चाैकीच्या मागील बाजूस समुद्रात मचले कुटुंबातील आठ लोक पोहण्यासाठी गेले होते.  त्यामधील काजल रोहन मचले (वय 17), सुमन विशाल मचले (वय 25, दोन्ही रा. कसबा बावडा कोल्हापूर मूळ राहणार हुबळी कर्नाटक) हे पाण्यात बुडुन मृत झाले आहेत. उमेश अशोक बागडे (वय 28) हा बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. 

पोहण्यासाठी गेलेल्या पैकी किसन जयसिंग मचले, पूजा उमेश बागडे, निर्मला जयसिंग मचले, ऐश्वर्या सुनिल मिनेकर यांना सुरक्षारक्षक व जीवरक्षक यांनी वाचविले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last video of the three drowned in the sea at Ganapatipule