esakal | आंबा, काजू दरासाठी लोकप्रतिनिधी गप्प का ? 
sakal

बोलून बातमी शोधा

Leaders Quiet On Mango Cashw Nut Rate Farmers Question

काजूचा दर सध्या 100 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मुळात उत्पादन खर्च शंभर रुपयांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी संकटात आला आहे. बदलत्या हवामानामुळे काजूचे उत्पादनही अत्यल्प आहे

आंबा, काजू दरासाठी लोकप्रतिनिधी गप्प का ? 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बांदा ( सिंधुदुर्ग ) - काजूचा दर प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत घसरल्याने कोकणातील काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात ऊस, कापूस, द्राक्ष, कांद्यासह अन्य पिकांच्या दराबाबत न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात.

प्रसंगी आंदोलन, उपोषण करतात; मात्र कोकणातील आंबा आणि काजू दरासाठी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का? असा सवाल रोणापाल सरपंच तथा सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघटनेचे सदस्य सुरेश गावडे यांनी उपस्थित केला आहे. काजूला किमान 150 रुपये दर न मिळाल्यास प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. 

ते म्हणतात की, काजूचा दर सध्या 100 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मुळात उत्पादन खर्च शंभर रुपयांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी संकटात आला आहे. बदलत्या हवामानामुळे काजूचे उत्पादनही अत्यल्प आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींकडून शासनस्तरावरून किमान 150 रुपये दर जाहीर करण्यासंदर्भात प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधी काजूला किमान 120 रुपये दर मिळावा अशी करीत असलेली मागणी हास्यास्पद आहे. 

काजू दरातील घट पाहता काजू शेती करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काजूला किमान 150 रुपये दर मिळालाच पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास लॉकडाऊन संपल्यावर सरकारला जाग आणण्यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

loading image