सावधान ! बिबट्याचा हल्ला आता दिवसाढवळ्याही, नागरिकांत भीती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

प्रत्येक वेळी तो जागा बदलत हल्ले करत आहे.

पावस (रत्नागिरी) : पावस पंचक्रोशीतील बिबट्याची दहशत वाढत आहे. नाखरे येथे पाळीव प्राण्यांवर त्याने हल्ला केल्यावर बिबट्याने पुन्हा एकदा पावस कुंभारघाटी परिसरातील जंगल भागात चरण्यासाठी गेलेल्या पाड्यावर रविवारी (११) हल्ला करून जखमी केल्याने त्याचा तेथील वावर अधोरेखित केला आहे.

रत्नागिरी तालुक्‍यातील साखरी मार्गावरील मेर्वी, जांभूळआड, परिसरात बिबट्याने माणसांवर हल्ले करून दहशत निर्माण केल्यावर वनविभागाने कॅमेरे व पिंजऱ्याच्या माध्यमातून जेरबंद करण्याकरता विशेष प्रयत्न केला. तालुक्‍यातील जांभूळआड येथील शेतकऱ्यावर पाच सप्टेंबरला हल्ला केल्यानंतर आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मेर्वी बेहेरे टप्पा येथे १४ सप्टेंबरला तिघां दुचाकीस्वारांवर हल्ला केला.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी तो परत येईल या आशेने पिंजरे व कॅमेरे लावण्यात आले. पण त्याने हुलकावणी दिल्याने वनविभाग हैराण झाला. प्रत्येक वेळी तो जागा बदलत हल्ले करत आहे. पावस कुंभारघाटी परिसरात चरण्यासाठी दुपारी तीननंतर गुरे सोडण्यात आली होती. त्यातील एका पाड्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. वनविभागाने पाड्यावर तातडीने उपचार केले. जोपर्यंत बिबटा पिंजऱ्यामध्ये जेरबंद होत नाही, तोपर्यंत हे सत्र सुरू राहण्याची शक्‍यता दिसत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack in konkan also in afternoon and morning also people fear this attack in ratnagiri

Tags
टॉपिकस
Topic Tags: