शिकारीसाठी त्याने लावली फासकी अन् बिबट्याच्या बछड्याला गमवावा लागला जीव....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

नाधवडे पाष्टेवाडी येथे फासकीत अडकुन बिबट्याचा मृत्यु ....

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : नाधवडे पाष्टेवाडी येथे शिकारीच्या उद्देशाने अज्ञाताने लावलेल्या फासकीत अडकुन बिबट्याचा मृत्यु झाला.हा प्रकार आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उजेडात आला.ही फासकी नेमकी कुणी लावली याचा शोध अद्याप लागलेला नाही.

नाधवडे पाष्टेवाडी येथील एका पायवाटेवर अज्ञात व्यक्तींने शिकारीच्या उद्देशाने फासकी लावली होती.या फासकीत काल रात्री बिबट्या अडकला.बिबट्याचा मागील भाग फासकीत अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नाही.दरम्यान आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास काही स्थानिकांनी फासकीत बिबट्या अडकल्याचे पाहीले.ही माहीती त्यांनी वनविभागाला दिल्यानतंर कणकवलीचे वनक्षेत्रपाल एस.बी.सोनवडेकर,वनपाल एस.एस.वाघरे,वनरक्षक ए.एच.काकतीकर,पी.डी.पाटील,के.जी.पाटील आदी घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा- अरे देवा काय ही वेळ ; आई पॉझिटिव्ह , वडीलांना अर्धांगवायू , दोन मुले क्वारंटाइन ,कोरोनाच्या भयाने शेजारीही लांब ... -

नाधवडे पाष्टेवाडीत बिबट्याचा मृत्यु

त्यांना बिबट्या मृतावस्थेत फासकीत असल्याचे दिसुन आले.त्यांनी बिबट्याला फासकीतुन बाहेर काढले.साधारणपणे अडीच ते तीन वर्षाचा हा पुर्णवाढ झालेला बिबट्या आहे.अधिकाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याला शवविच्छेदन करण्यासाठी कणकवलीला नेले
ज्या जमीनीत फासकी लावण्यात आली होती.ती जमीन राजापुर तालुक्यातील एका व्यक्तीची आहे.त्यामुळे ही फासकी नेमकी कुणी आणि कधी लावली याचा शोध अद्याप लागलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard death in nathawde pashtewadi in sindhudurg