रस्ता ओलांडताना वाहनाला धडकून बिबट्याचा मृत्यू

संदेश सप्रे
Saturday, 4 May 2019

संगमेश्वर : मुंबई - गोवा महामार्गावर तुरळ नजीक आज (ता. 4) पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. महामार्गापलीकडे असलेल्या पाणी साठ्यावर जात असताना ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

वाढलेल्या उष्णतेने जंगलातील पाण्याचे स्रोत कमी झाल्याने वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. पाण्याच्या शोधार्थ हे प्राणी  मानवी वस्तीकडे वळत असल्याचे पहायला मिळत आहे.

काल (शुक्रवार ) पहाटे पाण्याच्या शोधासाठी मुंबई गोवा महामार्ग ओलांडताना एका मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. महामार्गाच्या पलीकडील बाजूस पाण्याचा स्रोत असल्याने तुरळ हरेकरवाडी कडून महामार्गावरून कडवई साळवीवाडी भागाकडे पाण्यासाठी अनेक वन्यप्राणी रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ये जा करत असताना अनेक वेळा दिसून येतात. अशाच प्रकारे पाण्याच्या शोधात महामार्ग क्रॉस करत असताना अज्ञात वाहनांची धडक बसून या मादी बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

सकाळी या मार्गावरून प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूला हा बिबट्या पडला असल्याचे मुरडव गावचे पोलिस पाटील राजा मेने यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वनविभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर तात्काळ परिमंडळ वनाधिकारी सुरेश उपरे वनरक्षक आनंद धोत्रे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. या बिबट्याचे वय साधारणता ३ ते ४ वर्षे असावे असे उपरे यानि सांगितले. लांबी २०० सेंमी उंची ४० सेंमी असून याला १८ नखे असल्याची माहिती त्यांनी दिली. वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मागील उजव्या पायाला मार लागला असून जोरदार धडक मिळल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले.

या घटनेचा पंचनामा करून तालुका लघु पशु चिकित्सालय देवरुखचे सहायक आयुक्त आर. बी. जंगम यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर विभागीय वनाधिकारी विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड यांच्या प्रमुख उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिमंडल वनाधिकारी सुरेश उपरे वनरक्षक एन. एस. गावडे, आनंद धोत्रे, तुरळ पोलीस पाटील संजय ओकटे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard dies while crossing the road at sangamehswar ratnagiri