कासार्डे येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू 

Leopard Fall In Well In Kasarde Reported Dead
Leopard Fall In Well In Kasarde Reported Dead

तळेरे ( सिंधुदुर्ग) - कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ विहीरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 16) उघडकीस आली. भरवस्तीत बिबट्या घुसत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत माहिती अशी की, कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असणाऱ्या अतुल मुंडले यांच्या पत्नी घराच्या परसबागेतील विहीरीचा पंप चालु करण्यास गेल्या होत्या. पाणी येत नसल्याने त्यांनी विहीतील पंपात काही बिघाड झाल्याचे पहावयास विहीरीकडे गेल्या असता विहीरीतून काहीतरी आवाज येत असल्याचा संशय आल्यावर त्यांनी आपल्या पतीला याबाबत सांगितले. यानंतर विहीरीत कोणते तरी जनावर पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले. यावेळी विहीरीत बिबट्या पडल्याचे उघड झाले. 

यानंतर तातडीने श्री. मुंडले यांनी सरपंच बाळाराम तानावडे, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत घटनेची माहीती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र विहीरीत वीस फुटापेक्षा अधिक पाणी तसेच बिबट्याला पाण्यात राहण्यासाठी आसरा मिळत नसल्याने वनविभाग घटनास्थळी पोहचण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला वाचविण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले; मात्र वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच विहीत पडल्यापासून पाण्यातून बाहेर येण्यासाठी झुंज देणाऱ्या बिबट्याचा मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी फोंडा वनपाल शशीकांत साटम, भिरंवडे वनपाल सत्यवान, वनपाल दळवी, वनरक्षक अतुल सुतार, जाधव, बागवे आदी कर्मचारी पोहचले. 

बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व ग्रामस्थांनी साखळी गळ टाकून मृत बिबट्याचे शव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. सायंकाळ झाल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली. दुसऱ्यादिवशी पुन्हा एकदा पाण्यात तरबेज पोहणारे घोरपी समाजाचे धोंडी जाधव, राजेंद्र जाधव, सत्यवान होळकर, अनंत जाधव यांना पाचारण करुन विहीरीत उतरून शोध मोहीम सुरु करून लोखंडी गळ व काढीने पाणी हलवून मृत बिबट्याचा शोध घेण्यास सुरवात केल्यानंतर मृत बिबट्याचे शव हाती लागले.

यानंतर बिबट्याचा शव विहीरीतून बाहेर काढत वनपाल शशीकांत साटम, अतुल पाटील, सरदार मनेर व इतर कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. हा बिबट्या सुमारे दोने ते अडीच वर्षाचा असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला. बिबट्याचे शवविच्छेदन व अंत्यसंस्कारासाठी फोंडाघाट वनक्षेत्रकडे नेण्यात आले. मानवी वस्तीजवळ थेट बिबट्यांचा वावर असल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com