विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

अमोल टेंबकर
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

सावंतवाडी : साटेली-देवळसवाडी येथील रामचंद्र बावकर यांच्या घरालगत असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती येथील रहिवासी प्रशांत साटेलकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.

बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच स्थानिकांसह आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला हा बिबट्या विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत फसला असावा, असा अंदाज स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या तीन वर्षांचा असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Leopard out of the well successfully