esakal | मालवणातील मसुरे परिसरात बिबट्याची दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातील मसुरे परिसरात बिबट्याची दहशत

मालवण - मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक काल रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे. 

मालवणातील मसुरे परिसरात बिबट्याची दहशत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालवण - मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक काल रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे. 

मसुरे भागातील अनेक पाळीव जनावरांचा या बिबट्याने फडशा पाडला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास बिबट्या घराच्या परिसरात फिरत असल्याचे समीर प्रभूगावकर यांनी पाहिले. त्यांच्या मोटारीजवळ तो उभा होता. त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बिबट्या तेथून हलला नाही. अखेर आरडाओरड करताच त्या बिबट्याने भरतगड किल्ल्याच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची गंभीर दखल घेत त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

loading image
go to top