सावधान ! रात्रीच्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात `या` भागात बिबट्याचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी, जांभूळआड येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे वनविभागाने तातडीने मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकाला पाचारण केले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ते परिसरात दाखल झाले आहेत.

पावस ( रत्नागिरी ) - पूर्णगड, गणेशगुळे, जांभूळआड, मेर्वी मार्गावरून फिरणाऱ्या ग्रामस्थांना चक्रदेव बंगला कुर्धे येथे रात्री दहा वाजता दोन पिल्ले व बिबट्या मार्गक्रमण करताना दिसून आला. तसेच पूर्णगड येथे त्याच रात्री बिबट्या दिसला. अशा तऱ्हेने गाडीवरून जाणाऱ्या नागरिकांना रात्री दोनदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे कॅमेरा व पिंजरा यांना सध्यातरी बगल दिली आहे. 

रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी, जांभूळआड येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे वनविभागाने तातडीने मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकाला पाचारण केले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ते परिसरात दाखल झाले आहेत. बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी त्यांनी पूर्णगड, गणेशगुळे, जांभूळआड, मेर्वी अशा चार ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.

तसेच काही ठिकाणी पिंजरे बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर वनविभाग व पथकाच्या माध्यमातून परिसरात जंगल भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. परंतु अद्याप या मोहिमेला प्रतिसाद मिळालेला नाही; मात्र या मार्गावरून फिरणाऱ्या ग्रामस्थांना चक्रदेव बंगला कुर्धे येथे रात्री दहा वाजता दोन पिल्ले व बिबट्या मार्गक्रमण करताना दिसून आल्याचे सांगण्यात आले.

तसेच पूर्णगड येथे त्याच रात्री बिबट्या दिसला. अशा तऱ्हेने गाडीवरून जाणाऱ्या लोकांना रात्री दोनदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे कॅमेरा व पिंजरा त्याच्या संपर्कात न येता अन्य ठिकाणी मार्गस्थ होऊन त्याने आपला दिनक्रम सुरू ठेवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या दोन ठिकाणी दर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून अन्य ठिकाणी शोध मोहिमेस सुरु केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

दृष्टिक्षेपात 

  • पूर्णगड, गणेशगुळे, जांभूळआड, मेर्वी अशा चार ठिकाणी कॅमेरे 
  • मेर्वी, जांभूळआड येथील शेतकऱ्यावर बिबट्याचे हल्ले 
  • चक्रदेव बंगला कुर्धे येथे दोन पिल्ले व बिबट्याचे दर्शन 
  • पूर्णगड परिसरातही बिबट्याचे दर्शन 

पुन्हा तोच प्रकार होण्याची शक्‍यता... 
मागील वर्षी कुंभार घाटी परिसरात दुचाकीस्वारांवर लागोपाठ हल्ले केल्यानंतर त्या ठिकाणी महिनाभर वनविभागाने गस्त घालून बिबट्याला जेरबंद करण्याकरिता विशेष प्रयत्न केले. परंतु त्यांच्या कार्यक्षेत्राऐवजी बिबट्याने अन्य मार्गाचा अवलंब करून गावपातळीवर भ्रमण करण्यास सुरवात केली. त्यामुळे कॅमेरा व पिंजरा याला त्याने बगल दिली. तसाच प्रकार जांभूळआड परिसरात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Seen In Pawas Region In Night Ratnagiri Marathi News