सावधान ! लेप्टोचे संकट पुन्हा घोंघवतंय

lepto disease patients are found in kankavli again health department take care for this in sindhudurg
lepto disease patients are found in kankavli again health department take care for this in sindhudurg
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यात गेल्या आठ दिवसात लेप्टोस्पायरोसीसचे तब्बल १० रुग्ण आढळून आले होते. आता या सर्वांची तब्येत चांगली आहे; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने लेप्टो रुग्ण सापडलेल्या फोंडाघाट, कलमठ, हळवल, हरकुळ बुद्रूक आणि बोर्डवे गावांमध्ये सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

कणकवली तालुक्‍यातील अनेक गावात गेली काही वर्षे लेप्टो, तापसरी थैमान घालत आहे. वेळेवर आणि योग्य उपचार न झाल्यास लेप्टोचे रुग्ण दगावण्याची शक्‍यता अधिक असते. गेल्या दहा-बारा दिवसांत तापसरीच्या रुग्णांत वाढ झाल्याने आरोग्य विभागाने तापसरीच्या रुग्णांची एलायझा चाचणी सुरू केली होती. यात गेल्या आठ दिवसांत फोंडाघाट, कलमठ, हळवल, हरकुळ बुद्रूक आणि बोर्डवे या गावात एकूण १० रुग्ण आढळले. 

या सर्व रूग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून आज सांगण्यात आले; मात्र सर्व जोखीमग्रस्त गावांत नागरिकांची आरोग्य तपासणी आणि तापसरीबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी मुबलक प्रमाणात डॉक्‍सीच्या गोळ्या उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. तापसरीच्या रुग्णांनाही या गोळ्यांचे घरोघरी जाऊन वितरण सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com