संचारबंदीतही अर्धे शटर उघडून व्यवहार सुरु; चिपळूणातील प्रकार

विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई
संचारबंदीतही अर्धे शटर उघडून व्यवहार सुरु; चिपळूणातील प्रकार
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या संचारबंदीला बुधवारी (१४) रात्रीपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी चिपळूण शहरात नागरिकांनी संचारबंदी झुगारल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. मोठ्या आस्थापना बंद असल्या तरी शहराच्या बहुतांश भागात जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांसोबतच इतरही अनेक ठिकाणी शटर अर्धे उघडून तर कुठे शटर बंद करून व्यवहार सुरू असल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांची वर्दळ बाजारात कायम होती.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पंधरा दिवसासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. त्यासाठीची नियमावली जाहीर करण्यात आली. अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना सूचनाही देण्यात आल्या. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले आहे. असे असतानाही शहरातील बहूतांश भागातील व्यवहार गुरुवारी सकाळपासून सुरू होते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात रस्त्यांवर गर्दीही बघायला मिळाली.

काही भागात तर थेट दुकाने उघडून व्यवसाय सुरू होता. काही दुकाने अर्धे शटर उघडून व्यवहार करताना आढळून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही अंशी गर्दी कायम होती. त्यामुळे शहरात संचारबंदी आहे, असे कुठेही दिसले नाही; मात्र संचारबंदीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येण्याचे टाळल्याने शहरातील गर्दी बऱ्याच प्रमाणात ओसलल्याचे बघायला मिळाले.

दुचाकीवरून फिरणाऱ्यांची चौकशी

विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. चिंचनाका, बहादूरशेख नाका येथे पोलिस कर्मचारी ग्रामस्थांवर कारवाई करत होते. दुचाकीवरून फिरणाऱ्यांची चौकशी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

World Otter Day Special: The Harsh Survival Battle of Otters in Raigad’s Polluted Rivers
Long Struggle for Sawantwadi Station Naming Highlights Madhu Dandavate’s Legacy
ancient well discovered at Sagar Fort
Public Outrage Against Toll Collection on Incomplete Mumbai–Goa Highway
Marathi News Esakal
www.esakal.com