esakal | दिपक केसरकर यांनी स्वत:लाच का करुन घेतले कोरोंन्टाईन...?

बोलून बातमी शोधा

Lets all help our district liberate Corona kokan marathi news

प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात थांबून स्वतःला होम कोरोंन्टाईन करावे जेणेकरून आपण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही... 

दिपक केसरकर यांनी स्वत:लाच का करुन घेतले कोरोंन्टाईन...?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी केली.  प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात थांबून स्वतःला होम कोरोंन्टाईन करावे जेणेकरून आपण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही कोरोनाच्या या परिस्थितीत सर्वांनी काळजी घ्यावी त्यामुळेच मी ही स्वतःला होम कोरोन्टाईन केले आहे. असे आवाहन माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी केलें आहे. 

ते म्हणाले, 'घरात बसूनही कोरोना आजार पसरू नये यासाठी वेळोवेळी मी सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून आहे असे ही त्यांनी सागितले. बाजारपेठेत मास्कचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. त्यामुळे सर्वांनी रुमाल आपल्या चेहऱ्यावर बांधण्यासाठी वापर करावा असे ही ते म्हणाले.

हेही वाचा- बंदरावर मत्स्य विभागाची प्रमुख जेटींवर करडी नजर...

आहे तिथेच राहा

कापडी मास्क करण्याची ऑर्डर सिंधुदुर्ग मधील अनेक बचत गटाना देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात लवकरच मास्क उपलब्ध होतील. पण ही मास्क आपल्याला सेवा देत असणाऱ्या कर्मचारी, संस्था यांनीच वापर करायचा आहे. सर्वजण जर आपण मास्क वापरू लागलो तर वापरलेली मास्कची कशा प्रकारे विल्हेवाट लावावी हा प्रश्न निर्माण होईल. तसेच दोन तीन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हेंटिलेटर येणार आहेत. त्यामुळे पुढे काही मोठ संकट आल्यास त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. शासनाने आदेश दिल्या प्रमाणे सर्वांनी आहात तिकडेच थांबावे. गोव्यात काम करणारे अनेक युवक सिंधुदुर्गात येण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांनी इथे न येता त्याचं ठिकाणी थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असेही श्री केसरकर म्हणाले.

हेही वाचा-बातमीचा परीणाम ; संगमेश्वरातील अखेर ती कंपनी आजपासुन बंद...

सर्वांनी सहकार्य करून आपल्या जिल्ह्याला कोरोना मुक्त करुया
गोव्यातील दोन मोठ्या इंडस्ट्रीज सोबत आपले बोलने झाले असून ते त्या युवक युवतींना जेवणाची सोय करण्यास तयार आहेत. यासाठी आपण आहात त्या ठिकाणचा पत्ता जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर द्यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेला रुग्णाच्या तब्येतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होत असल्याचेही ते म्हणाले. तसेच सर्वांनी सहकार्य करून आपल्या जिल्ह्याला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही आमदार श्री. केसरकर यांनी केले आहे.