बाळासाहेब थोरातांचे "ते' पत्र संशयास्पद 

Letter Given By Congress State President Balasaheb Thorat In Suspicious
Letter Given By Congress State President Balasaheb Thorat In Suspicious

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत रिंगणात असलेले ऍड. दिलीप नार्वेकर यांनी समोर आणलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे शुभेच्छा पत्र संशयास्पद आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडे एबी फॉर्म आला नाही. त्यामुळे हे एक षड्‌यंत्र आहे, असा दावा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे केला. यावेळी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत महविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. 

शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद शिल्पग्राम येथे झाली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, वसंत केसरकर, राजन पोकळे, सुरेश गवस, सावळाराम अणावकर, रूपेश राऊळ, शिवाजी घोगळे, उदय भोसले, शब्बीर मनियार, राजेंद्र म्हापसेकर, आनारोजीन लोबो, सुधीर मल्हार, काशिनाथ दुभाषी, भास्कर परब, बाळ कनयाळकर, सागर नाणोसकर, सत्यजित धारणकर, पुंडलीक दळवी, सिध्देश परब आदी उपस्थित होते.

कुडतरकर निष्कलंक व सर्वसामान्य कार्यकर्ते

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पडते म्हणाले, ""नगराध्यक्षपदाचे महाआघाडीचे उमेदवार कुडतरकर आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून शहराच्या विकासाला हातभार लावलेला आहे. माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी देखील शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणलेला आहे. काही कामे प्रगतीपथावर असून काही निविदा प्रक्रियेत आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणवर प्रेम आहे. या प्रेमापोटी कोकणचा विकास झपाट्याने होईल. श्री. कुडतरकर निष्कलंक व सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. शहराच्या विकासात ते नक्कीच प्रगती करतील.'' 

कुडतरकर यांनाच मदत करणार

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, ""महाविकास आघाडीचे उमेदवार कुडतरकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय होतील. ऍड. नार्वेकर यांना पक्षाने नामनिर्देशन पत्र भरण्यास सांगितले होते. महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल त्यावेळी नामनिर्देशनपत्र मागे घ्यावयाचे होते. तसा कॉंग्रेस प्रदेक्षाध्यक्ष यांचा आदेश देखील आम्ही त्यांना पोहोचवला. तरीही त्यांनी नामनिर्देशनपत्र कायम ठेवले आहे; पण कॉंग्रेसचे पदाधिकारी उमेदवार कुडतरकर यांनाच मदत करणार आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणणारे ऍड. नार्वेकर यांनी पक्षाचा आदेश पाळलेला नाही.'' 

थोरात मराठीत सही करत नाहीत

ते म्हणाले, ""नार्वेकरांना आलेले प्रदेशाध्यक्षांचे ते पत्र संशयास्पद आहे. बाळासाहेब थोरात मराठीत सही करत नाहीत. हा सर्व प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. माझ्याकडे एबी फॉर्म आले नाहीत. त्यामुळे हे सर्व षडयंत्र आहे. नार्वेकर जे वागले ते निष्ठावंताना न शोभणारे आहे. त्यांनी घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. शहरातील मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे कोणी कितीही मतदारांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न केला. तरी महाविकास आघाडीच्या बाजूने येथील मतदार कौल देतील. कॉंग्रेस उमेदवार म्हणून नार्वेकर रिंगणात असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार हे कुडतरकर आहेत. सिम्बॉल लेटर, शुभेच्छापत्रबाबतीत प्रदेक्षाध्यक्ष चौकशी करतील.'' 

तिनही पक्षांचे समन्वयाने काम

यावेळी माजी राज्यमंत्री भोसले म्हणाले, ""शिवसेनेचे हिंदुत्ववादी विचार होते; परंतु लोकसभेत नागरिकत्व बिलाला विरोध व मुख्यमंत्री यांनी धर्मावर राजकारण करण्याची चूक मान्य केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काळानुरूप घेतलेला हा निर्णय आहे. तिनही पक्षातील नेते एकत्र काम करतील. याठिकाणी तिन्ही पक्ष प्रमुख असतील.'' महाविकास आघाडीत नव्हे तर तिनही पक्षांचे समन्वयाने काम होईल. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुडतरकर यांच्या प्रचारार्थ समन्वयक समिती असेल, असे राष्ट्रवादीचे सामंत यांनी सांगितले. 
 

तिन्ही पक्षांची समन्वय समिती 

जिल्ह्यात महाविकास आघाडीची समन्वय समिती निर्माण होईल असे सामंत यांनी सांगितले. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम स्वतंत्र असेल. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीचा अडथळा निर्माण होणार नाही, असे विकास सावंत, संजय पडते व अमित सामंत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com