हॉस्पिटलचे उद्घाटन पवारांकडून अन् मेडिकल कॉलेजचे शहांकडून  : चर्चेला उधाण, पाहा व्हिडिओ

life time Hospital inaugurated by sharad Pawar and Shah of Medical College political marathi news
life time Hospital inaugurated by sharad Pawar and Shah of Medical College political marathi news

ओरोस  (सिंधुदुर्ग)  : राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सिंधूदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ या माध्यमातून सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथील नैसर्गिक अधिवासात उभारलेल्या  लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचा शुभारंभ ७ फेब्रूवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सोशल मिडियावर याच मेडिकल कॉलेज नजिक  राणे यांनी उभारलेल्या ६५० बेडच्या सुसज्ज हॉस्पिटलच्या शुभारंभाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
        

 राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना २०१४ पूर्वी  राणे यानी कुडाळ तालुक्यातील पडवे येथील माळरानावर सिंधूदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ६५० बेडचे हॉस्पिटल व १५० विद्यार्थी क्षमतेचे मेडिकल कॉलेज उभारण्याचा शुभारंभ केला होता. यानंतर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज इमारत उभारणीचे काम सुरु झाले होते. त्यानंतर लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकामध्ये कॉंग्रेसची केंद्र व राज्यातील सत्ता गेली. त्यानंतर अनेक सत्तांतरे झाली. दरम्यानच्या चार वर्षात राणे यांच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे त्यांनी या हॉस्पिटलचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्यातील तत्कालीन युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. २७ मे २०१८ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यानी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले असून ते लोकांच्या सेवेत अर्पण करीत आहोत.

मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप मेडिकल कॉलेजला परवानगी मिळालेली नाही. लवकरच १५० विद्यार्थी क्षमतेची परवामगी मेडिकल कॉलेजला मिळेल, असे जाहिर केले होते. त्यानुसार केंद्र सरकारने लाईफ टाईम मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. पहिल्या वर्षिची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ४०० विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास इच्छुक होते. त्यातील केवळ १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. यानंतर खा राणे यानी ७ फेब्रूवारी २०२१ रोजी मेडिकल कॉलेजचा शुभारभ केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याहस्ते केला. मात्र, २७ मे २०१८ रोजी केवळ लाईफ टाईम हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com