esakal | लयभारी ! नेट नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाईन व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Off Line Video Made For Students Who Have Not Net Facility

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला जिल्ह्यातील बहुदा पहिला उपक्रम आहे.

लयभारी ! नेट नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाईन व्हिडिओ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - इंटरनेटअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अडथळे येतात. ते दूर करण्यासाठी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षण देण्याच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमावर आधारित व्हिडीओ तयार केले आहेत. त्यासाठी पस्तीस शिक्षकांनी तयार केलेले शंभरहून अधिक व्हिडीओ व्हॉटस ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणामध्ये होणारा खोळंबा ऑफलाईनमुळे काहीअंशी दूर होण्यास मदत झाली आहे. 

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला जिल्ह्यातील बहुदा पहिला उपक्रम आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले व्हिडिओ 35 तंत्रस्नेही शिक्षकामार्फत बनविले जात आहेत. व्हिडिओ बनविण्याचे काम सुरू असून आजपर्यंत शंभरहून अधिक व्हिडिओ बनविले आहेत. 

हे व्हिडिओ केंद्रप्रमुख आणि शिक्षकांच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहच करण्यात येतात. त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केले आहेत. त्यासाठी केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षण विभागातील महेश हळदणकर, समीर तांबे, ज्ञानेश्‍वर गुरव, नितेश देवळेकर, हणमंत सोमवारे, तन्वीर खान, मुकेश मधाळे, भूपाली देसाई, शशिकला लोंढे, सुमती पेंडखलकर, रूबिना नावलेकर हे विषयतज्ञ काम पाहतात. 

व्हिडिओ बनविणारे शिक्षक 
भूमिका सावंत, संदीप परटवलकर, निशा मिरगुले, निशा देसाई, गणेश गोरे, सुभाष चोपडे, मनीषा बाकाळकर, 
सुनील जाधव, ज्ञानेश्‍वर वाघाटे, गजानन नेवरेकर, नितीन पांचाळ, मैथिली लांजेकर, नंदकिशोर दिघोळे, ज्योतिर्लिंग कोळी, स्मिता मयेकर, उदयकुमार नाईक, राजू कोरे, संदीप कंदुरकर, ज्योतिबा पाटील, रूपाली दोरूगडे, सुनील पाटील, तुकाराम पाटील, राजीव ढेरे, अनिल मोहिते, पूर्वा दातार, दिनेश कुलपे, सुजित जाधव, प्रसाद पंगेरकर, राहुल गावित, रोहन आदमापुरे, लक्ष्मण घाडीगावकर, नरेंद्र मेजारी, सुग्रीव मुंडे, दर्शना मांडवकर, हिदायत भाटकर. 
 

 
 

loading image