
बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू पकडण्यात मोठे यश आले. बेकायदा गोवा बनावटीच्या वाहतुकीविरोधात इन्सुली एक्साईज विभागाने आज सकाळी कारवाई केली. या कारवाईत २३ लाख ९७ हजार रुपयांच्या दारूसह एकूण ३९ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासणी सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन चालक पसार होण्यात यशस्वी झाला. या कारवाईत व्हिस्कीची तब्बल २३५ खोकी जप्त करण्यात आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेला आयशर टेम्पो (एमएच १८ बीजी ७०२२) ताब्यात घेण्यात आला.