पाली - माणगाव येथील विकास कॉलनी परिसरात राहत असलेल्या गणेश सुतार यांना नुकतेच त्यांच्या घरासमोर पक्ष्याची दोन लहान पिल्ले आढळून आली. त्यांची लहान मुलगी प्रीत हिचे या पक्ष्याच्या पिल्लांकडे लक्ष गेले, हि पिल्ले उडण्यास असमर्थ होती, दोन्ही पिल्ले एकमेकांना चिटकून असल्याचे लक्षात आले. गणेश सुतार यांनी त्वरीत माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना संपर्क साधला. त्यानंतर सर्वांनी पिल्लांना मुक्त केले.