संक्रमणाच्या काळातच मंडणगडातील प्रशासन झाले लॉकडाऊन...

Local administration lockdown in mandangad
Local administration lockdown in mandangad

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना विषाणू संसर्गाच्या बदलत्या परिस्थितीला सामोर जाण्यास जिल्हा प्रशासन असमर्थ असल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी यांनी  स्पष्ट केली. या भुमीकेचे पडसाद मंडणगड तालुका पातळीवर दिसून आले. गर्दी न होण्यासाठी भिंगळोली येथील तहसिल व पोलीस कार्यालयात गेट बंद करण्यात आले असून दोन्ही कार्यालयातील सरसकट प्रवेशावर अंकुश आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कोरोनाबाबत प्रशासनाच्या बदलेल्या भूमीकेमुळे गेले दोन महिने तालुक्यातील जनतेने रोगापासून दूर राहण्यासाठी केलेली मेहनत फुकट जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थलांतरीतांमुळे तालुक्यात कोरोनाने आपली हजेरी लावली आहे. तर आता तर शेकडोंच्या संख्येने नागरीक तालुक्यात दाखल होत आहेत. त्यामुळे तालुक्यात आता खऱ्या अर्थाने संक्रमणाची सुरुवात झाली असून यावर प्रशासनाने केवळ बघ्याची भूमीका घेतल्यास परिस्थिती खुपच हाताबाहेर जाणाची शक्यता आहे.

स्थानीक पातळीवर तालुक्यात मुंबईतून विविध मार्गाने दाखल होणाऱ्या नागरीकांऩा थेट त्यांच्या गावात पाठवीले जात आहे. त्यांना गावातील त्यांच्या घरात क्कारंन्टाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाग्रस्थांचा कोणताही नवीन स्वॅब गेल्या दोन दिवसात तालुक्यात गोळा झालेला नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात राबवण्यात आलेली ग्राम कृती दलाची संकल्पना आता वाडी कोंडावर राबवून वाडी रक्षक कृती दलाची संकल्पना राबवण्याची पंचायत समिती मंडणगड व गटविकास अधिकारी यांना सुचना करण्यात आल्याची माहीती तहसिलदार नारायण वेगुर्लेकर यांनी दिली आहे. 17 मे 2020  पर्यंत तालुक्यात कोराना संक्रणाचा धोका सर्वाधीक असल्याचे यंत्रणेकडून मान्य झाले असले तरी कोरोना विरोधातील लढाईच्या महत्वाच्या टप्यात हातावर हात ठेवून बसण्याच्या प्रशासनाचे नव्या भूमीकेमुळे तालुक्यातून मोठे आश्चर्य व्यक्त केले गेले आहे.

ग्रामरक्षक नंतर वाडीरक्षक कृती दल संकल्पना

लॉक डाऊनची तालुक्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने ग्रामिण भागात कोरोना विषाणू संसर्ग या विषयावर सर्वसामान्यांमध्येही मोठी जागरुकता झाली आहे. दुसरीकडे राज्यशासनाने कोकणातील चाकरमान्यांना मुंबईतून आपल्या घरी जाण्याची परवानगी दिल्याने खाजगी वाहने एस.टी. मिळेल त्या मार्गाने चाकरमानी तालुक्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातील नागरीकांच्या चिंता वाढल्या आहेत. मंगळवार 13 मे 2020 रोजी गावागावात ग्राम रक्षक कृती दलाच्या सभा झाल्या असून वाडी रक्षक कृती दलाचे माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा प्रशासकीय यंत्रणेच्या आगामी काळात पवित्रा असल्याने कोरोनो विरोधातील लढाई आता नागरीकांना स्वतःच लढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुबंईतून तालुक्यात गावागावात दाखल होणाऱ्या नागरीकांना स्थानीक पातळीवर विरोध होऊन नागरिकांमध्ये तेढ वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था न झाल्यास गावातील शाळांमध्ये ग्राम रक्षक कृती दलासच अशा ग्रामस्थांची निवास व भोजनाची व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान आरोग्य विभागास नवीन स्वॅब न पाठवण्याचे सुचीत करण्यात आल्याची माहीती मिळत आहे. सध्याची केवळ सोशल डिस्टीसंगचे आवाहन करणारी व स्वतःची काळजी घ्या रोगापासून दूर रहा असे सांगणारी प्रशासनाची भूमीका आश्चर्यात टाकणारी आहे.

प्रशासन म्हणते होम क्कारंन्टाईन तर ग्रामस्थ संभ्रमित
 प्रशासन सरसकट सर्व तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना प्राथमिक तपासणी नंतर होम क्कारंन्टाईन शिक्का मारून स्वगृही क्कारंन्टाईन करीत आहे. तर प्रशासनाच्या या भूमीकेमुळे गावातील ग्रामस्थ संभ्रमित झाले असून येणाऱ्या नागरिकांना गावाबाहेर व्यवस्था करून किंवा बंद घरात ठेवण्याचा विचार करीत आहेत. मात्र त्यातही अडचणी निर्माण होत असून वैचारिक तेढ आणि मुंबई गाव दुरी वाढण्याचीच शक्यता अधिक दिसू लागली आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com