"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती आहे; मात्र जानेवारीमध्ये निकाल लागला तर एप्रिल-मेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील."
कणकवली : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (local Body Election in Maharashtra) २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबरोबरच नगरपालिकांच्या निवडणुका रद्द झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिल्यानंतर या प्रकरणाचा निकाल आता २२ जानेवारीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल २०२५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याखेपेस मागील निवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार तयारीला लागले असले तरी त्यांची प्रतीक्षा काही संपली नव्हती.