esakal | लॉकडाउनमध्ये सर्वाधिक झळ 'या' व्यवसायिकांना
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown effect on saloon shops in chiplun

सध्या ग्राहक कमी आणि सेवादर तिप्पट असे तोट्याचे गणित कारागिरांना सोडवावे लागत आहे

लॉकडाउनमध्ये सर्वाधिक झळ 'या' व्यवसायिकांना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पळूण : तालुक्‍यातील केशकर्तनालये सुरू असली, तरी दरवाढ आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने ग्राहक केशकर्तनालयात जाण्यास टाळत आहेत. त्यामुळे सध्या ग्राहक कमी आणि सेवादर तिप्पट असे तोट्याचे गणित कारागिरांना सोडवावे लागते. लॉकडाउनमध्ये आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ बसलेला केशकर्तन व्यवसाय पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

हेही वाचा - गुड न्यूज! अखेर कोकण रेल्वे धावणार, गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या...

केस कापण्यासाठी कर्तनकार ग्राहकांच्या अधिक निकटच्या संपर्कात येत असल्याने आणि मास्क वापरण्याच्या नियमामुळे दाढी करणे जवळपास अशक्‍य असल्याने या व्यवसायातील कारागिरांना कोणतीही सवलत मिळालेली नव्हती. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दुप्पट ते तिप्पट दराने ग्राहकांना सेवा मिळवावी लागली.

दाढी न करण्याच्या अटीवर कर्तनालयात केस कापण्यात यावेत, ग्राहकाकडे मास्क नसल्यास ती त्याला पुरविणे, स्वत: मास्क घालणे, चेहरा आणि डोळ्याला सुरक्षा मिळविण्यासाठी प्लास्टिक सुरक्षा कवच (शिल्ड) लावणे, अंगावर बांधण्याचे वस्त्र (ॲप्रन), ब्लेड, वस्तरा, कात्री व इतर साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे असे नियम घालून देण्यात आले. त्याचा खर्च वाढल्याने केशकर्तन व्यावसायिकांनी केस कापण्याचे दर वाढविले. आता १०० रुपये घेतले जातात. हे दर काहींच्या आवाक्‍याबाहेरचे आहेत. घरी येऊन केस कापण्यासाठी ३०० रुपये आकारण्यास सुरवात केल्याने अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये शेतीकडे वळलेला युवावर्ग हताश, जाणून घ्या कारण...

"लॉकडाउनच्या काळात सलून चालकांसह सर्वांचे आर्थिक स्रोत आटले. सामान्य लोकांचेही हाल झाले. या साऱ्याचा विचार करून केशकर्तन व्यावसायिकांनी दर निश्‍चित करणे गरजेचे होते. या साऱ्या प्रकारात शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करायला हवा."

- सुभाष जाधव, ग्राहक, चिपळूण

"आम्ही सर्व नियम पाळून व्यवसाय करतो. पूर्वीसारखे लोक सलूनमध्ये येत नाहीत. कर्तनालयात एक कारागीर दिवसाला १० ते १५ ग्राहकांना सेवा देत होते. मात्र, टाळेबंदीत अंतराचा नियम आणि निर्जंतुकीकरणाची जबाबदारी आली. त्यासाठी साहित्य खरेदी करावे लागल्याने ही दरवाढ केली."

- दिलीप चव्हाण, सलून चालक

संपादन - स्नेहल कदम