मंडणगडात ब्रेक द चेनला शंभर टक्के प्रतिसाद ; ११३ जणांवर नगरपंचायतीची दंडात्मक कारवाई...

lockdown impact for mandangad ratnagir
lockdown impact for mandangad ratnagir

मंडणगड (रत्नागिरी) : जुन महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याधिकारी  यांनी ब्रेक दे चेनची साद घालत 1 ते 8 जुलै 2020 दरम्यान आठ दिवसाचे कालावधीसाठी घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या पहील्या दिवशी तालुक्यात सर्वच ठिकाणी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. मंडणगड शहराची बाजारपेठ व तालुक्यातील देव्हारे, कुंबळे, म्हाप्रळ, पंदेरी, वेसवी, बाणकोट या ठिकाणी जीवनावश्यक औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तर शहर परिसरात मास्कचा वापर न करणाऱ्या ११३ नागरिकांवर मंडणगड नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.


जिल्ह्याधिकारीयांनी घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात ता.29 व 30 जुन 2020 रोजी तालुक्यातील नागरीकांनी अभूतपुर्व गर्दी केलेली दिसून आली. अगदी गणेशोत्सवाच्या कालावधीतही शहरात इतकी वाहतूक व नागरीकांची गर्दी दिसून येत नाही. आठ दिवसांचा लॉक डाऊन 31 जुलैपर्यंत वाढवीला गेल्यास आवश्यक वस्तुंचा तुटवडा पडू नये यासाठी ग्रामिण भागातील जनतेने बांधकाम साहीत्यासह जीवनवाश्यक वस्तुंच्या खरेदी करिता शहरात मोठी गर्दी केल्याने संसर्ग रोखण्यााकरिता गरजेचा असलेल्या सोशल डिस्टीसींगला हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले होते.

१ जुलै पासून लॉकडाऊनच्या कालावधीत दोन, तीन व चार चाकी वाहनांच्या वाहतूकीस बंदी असल्याने शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंडणगड नगरपंचायतीने शहर परिसरात कर्मचारी तैनात करुन लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून आले.मंडणगड शहरात ११३ जणांवर दंडात्मक कारवाई
मंडणगड नगरपंचायत; ५६ हजार ५०० दंड वसूल; मास्क वापरण्याचे आवाहन..

मंडणगड नगरंपचायतीच्या हद्दीत सोशल डिस्टसींगचे नियम मोडुन मास्क न वापरणाऱ्या 113 नागरीकांविरोधात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दंडाची कारवाई करताना आतापर्यंत 56  हजार 500 रुपयांची रक्कम दंडाचे रुपाने वसुल केल्याची माहीती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. शहरात कोरोना ब्रेक द चेनला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर प्रवेशद्वार व चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलै ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाची ब्रेक द चेन या स्लोगण खाली लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात .३० जून रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

शहरातील व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचे नियम पाळा, गर्दी करू नका, ब्रेक द चेनला सहकार्य करा अशा सूचना उद्घोषणेद्वारे देताना आवाहन करण्यात आले होते. दोन दिवस ग्रामीण भागातील नागरिकांनी बँका, दुकानातून प्रचंड गर्दी केली होती. अनेक नागरिक मास्क न वापरता फिरताना दिसून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com