मुंबईच्या तरूणांचा पुढाकार : अन् या गावात भरली मुलांसाठी 2 तास शाळा...

.मुझफ्फर खान
Tuesday, 21 July 2020

लॉकडाउनमुळे मुंबईतून आलेल्या तरूणांनी यासाठी पुढाकार घेतला.

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण तालुक्यातील कुटगिरी पुनर्वसन येथील लहान मुलांसाठी रोज 2 तास शाळा भरवली जाते. पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. वाडीतील मुले यात आनंदाने सहभाग घेत आहेत. येथील मुलांसाठी दररोज 2 तास शाळा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय बनलाआहे.लॉकडाउनमुळे मुंबईतून आलेल्या तरूणांनी यासाठी पुढाकार घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पसार झपाट्याने होत आहे. यातच लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग-धंदे ठप्प आहेतच, पण शाळा, कॉलेज देखील बंद आहेत. शासनाने काही ठिकाणी ई-लर्निंग सुरु केले आहे. परंतु गाव खेड्यात ई-लर्निग साठी आवश्यक साधन सामग्री इंटरनेट उपलब्ध असेलच असे नाही. लॉकडाऊनचा कालावधी फुकट जाऊ नये आणि शाळकरी मुले अभ्यासापासून लांब जाऊ नये म्हणून काही गावात ग्रामस्थांकडून शैक्षणिक उपक्रम राबवताना दिसत आहेत.

हेही वाचा - जाणून घ्या चिपळूणातील कोरोनामुक्तीची वाटचाल.... -

मुंबई सोडून गावी आलेल्या तरूणांपैकी कोणी शेती सुरू केली आहे तर कुणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. कुटगिरी पुनर्वसन गावातील तरूणांनी गावातील लहान मुलांचे भविष्य घडविण्यासाठी पुढाकार घेतला. लॉकडाऊनमुळे मुंबईतून कुटगिरी गावात आलेल्या 12 तरूणांनी पुढाकार घेवून मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावातील ज्येष्ठ नागरिकांकडे हा विषय मांडण्यात आला. त्यांनीही मान्यता दिली.

हेही वाचा - त्या बैठकीला उपस्थित होते नाईक  : पालकमंत्री उदय सामंतसह वरिष्ठ  अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार..... -

कुटगिरी पुनर्वसन वसाहतीमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिकणारे 10 विद्यार्थी आहेत. ते शिक्षणापासून लांब जावू नये यासाठी साक्षी कदम, नंदिनी कदम, श्रेया कदम, आशिष कदम, प्रतिमा कदम, पंकज कदम, अदिती कदम, हृषीकेश कदम, वैष्णवी कदम यांनी पुढाकार घेतला. हे तरूण मुलांना 2 तासाच्या शाळेत मराठी, गणित, इंग्लिश या प्रमुख विषयांसोबतच इतर विषय  शिकवतात. मुंबईतून आलेल्या या तरूणांचे कुटगिरी परिसरात कौतुक होत आहे 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown impact the youth from Mumbai took the initiative 2 hours of school daily for young children