कोरोना काळात ‘साईन ऑफ’ होताना अडचणी ; पण भारतात सुखरूप आले कॅप्टन ..

lockdown positive story in ratnagiri
lockdown positive story in ratnagiri

रत्नागिरी : शिपवर जॉईन झालो, तेव्हा कोरोनाचा मागमूसही नव्हता. चीन, हाँगकाँगमध्ये प्रसार झाल्यावर खबरदारीचे संदेश मिळाले. त्या वेळी फारशी काळजी वाटत नव्हती. पण पुढच्या प्रवासातही साईन ऑफ होताना अडचणी आल्या, काळजी वाटू लागली. दोन महिने जादा नोकरी करून, वेगवेगळ्या देशांत हिंडून आलो. पण परमेश्‍वराच्या कृपेमुळेच साईन ऑफ केले व भारतात सुखरूप परतल्याची भावना रावतळे (चिपळूण) येथील कॅप्टन नीलेश शेंबेकर, काश्‍मिरा शेंबेकर यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.


कॅप्टन शेंबेकर म्हणाले, ऑगस्ट २०१९ ला चार महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्‍टसाठी मी शिपवर जॉईन झालो. कालांतराने पत्नी काश्‍मिरा ऑक्‍टोबरमध्ये कॅनडाला मला जॉईन झाली. डिसेंबरमध्ये कोरोनाच्या बातम्या येऊ लागल्या. चीनमध्येच फैलाव असल्याने तसे काळजीचे कारण वाटले नाही. हाँगकाँगस्थित कंपनीने सगळ्या शिप्सना खबरदारीचे संदेश पाठवले. जानेवारीच्या अखेरपर्यंत फैलाव फक्त चीन, हाँगकाँग व काही दक्षिण आशियाई देशांपुरता मर्यादित होता. जानेवारीत स्पेनच्या कार्टाजेना या पोर्टला व तिथून इटलीच्या पोर्टव्हेसमी या पोर्टला गेलो. इटलीच्या पश्‍चिमेला सार्डिनिया प्रांतात हे पोर्ट आहे. तेव्हा तिकडे कोरोनाचा मागमूसही नव्हता. 


ते म्हणाले, इटलीहून २ फेब्रुवारीला निघालो व स्पेनच्या डाविलेस या पोर्टला पोहोचलो. त्यावेळी स्पेनमध्ये सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. स्पेनहून युक्रेन, इंग्लंड असा प्रवास ठरला होता. इटलीहून निघालो, तेव्हा शिप जॉईन करून ६ महिने झाले होते. करारापेक्षा २ महिने अधिक झाले होते. त्यामुळे ॲव्हिस स्पेनहून घरी पाठवण्याची विनंती कंपनीला केली. काश्‍मिराकडे शेनगन व्हिसा नसल्याने तिचा व पर्यायाने माझा साईन ऑफ शक्‍य नाही, असे स्पेनच्या एजंट व कंपनीने कळवले. त्याचप्रमाणे युक्रेनचासुद्धा व्हिसा नसल्याने तिथूनही तिचा साईन ऑफ होणार नव्हता.

सुदैवाने साईन ऑफ इंग्लंडला १५ मार्चला पोहोचणार होतो. सुदैवाने स्पेनला पोहोचायच्या एक दिवस अगोदर एजंटने काश्‍मिराच्या साईन ऑफसाठी ट्रांझिट व्हिसा मिळू शकतो, असे कळवले. हे सगळे शेवटच्या क्षणी ठरल्यामुळे साईन ऑफची व्यवस्था होणार नव्हती. त्यामुळे काश्‍मिरा एकटीच साईन ऑफ होऊन भारतात परतली. स्पेनहून निघून युक्रेनला जहाज फेब्रुवारीत पोहोचले. तिथे कंपनीने साईन ऑफची व्यवस्था केली, असे शेंबेकर यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com