पावणेदोनशे दिवसांचे कोकणी जीवन उलगडले लॉकडाउनच्या डायरीतून

मकरंद पटवर्धन
Saturday, 19 September 2020

कोकणातील दैनंदिन जीवनाची ही एक आगळीवेगळी झलक यात पहावयास मिळेल. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत घडामोडींची डायरी लिहिली आहे

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात सुरवातीला टाईमपास म्हणून कृष्णधवल आणि रंगीत प्रकाशन चित्रांविषयी फेसबुकवर माझी लॉकडाउन डायरी (रोजनिशी) लिहायला सुरवात केली. लॉकडाउन वाढत गेला आणि लेखनही अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू ठेवले. कोकणातील दैनंदिन जीवनाची ही एक आगळीवेगळी झलक यात पहावयास मिळेल. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत घडामोडींची डायरी लिहिली आहे, छायाचित्रकार सिद्धेश वैद्य यांनी.

हेही वाचा - सरकारने ठरविलेच आहे जनतेच्या जीवाशी खेळायचे ; निलेश राणे

 

हौशी छायाचित्रकारांचा ‘लेन्स आर्ट ग्रुप’ स्थापन करून नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या सिद्धेशला सोशल मीडियातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याने सांगितले, लॉकडाउनमध्ये ‘टाईमपास’ म्हणून सुरू केलेली ही डायरी भरपूर पुढे गेली आहे. याचे श्रेय डॉ. सुधीर हसमनीस यांना जाते. कारण त्यांच्या रोजच्या म्हणजे आजपर्यंत १७०० पोस्ट फेसबुकवर आहेत. एकही दिवस त्यांनी चुकवला नाही, त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. असे काही लिहितोय म्हटल्यावर आई-बाबा व पत्नीने आनंद व्यक्त केला.

यात १७४ पोस्ट लिहिल्या. याचे पुस्तक रूपांतराचे काम सुरू आहे. सिद्धेश म्हणाला, २३ मार्चला लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी लिहायला सुरवात केली. पहिल्यांदा केवळ २१ दिवसांसाठी सुरू केलेला हा प्रपंच वाढत्या लॉकडाउनसोबत वाढत गेला. डायरी लिहायच्या सातत्यामुळे कलाप्रेमी फेसबुक पेजवर लाइव्ह गप्पा व एफएम रेनबो मुंबईवरही मुलाखत झाली.

हेही वाचा - शिक्षकांच्या सहभागाने कोकणात ऑफलाइन शिक्षण पद्धतीही रुजतीये..!

 

जुने व नवे मित्र भेटले !

डायरी अजून १५-२० वर्षांनी पुन्हा वाचताना लॉकडाउनचा एक वेगळाच अनुभव येईल. या काळात निसर्ग, आरोग्य, आयुष्य आणि पैशाचे महत्त्व सर्वांना कळले आहे. पाच महिन्यात घरात बसून अनेक नवीन मित्र मिळवले. बऱ्याच जुन्या मित्रांबरोबर पुन्हा संपर्क झाला. खूप मोठा ऐतिहासिक प्रसंग आपण अनुभवला.

 

संपादन - स्नेहलत कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown special kokan life story written by siddhesh vaidya in rangari named as lockdown diary