Loksabha 2019 : मी काय करेन ते उद्धवला चांगलंच माहिती - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

सावंतवाडी -  उद्धव, तू माझं नाव तरी घेऊन दाखव असे आव्हान देत खासदार नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाटेला येऊ नये, माझ्या रस्त्यात जर तुम्ही आलात, तर  मी काय करेन हे उद्धवला चांगलंच माहिती आहे, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला. 

सावंतवाडी -  उद्धव, तू माझं नाव तरी घेऊन दाखव असे आव्हान देत खासदार नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाटेला येऊ नये, माझ्या रस्त्यात जर तुम्ही आलात, तर  मी काय करेन हे उद्धवला चांगलंच माहिती आहे, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांच्या लोकसभा प्रचारासाठी नारायण राणे यांची शनिवारी रात्री येथे सभा झाली. यामध्ये श्री. राणे बोलत होते.  

श्री. राणे म्हणाले, शिवसेनेचा माझ्यावर एवढा राग का ? शिवसेना छगन भुजबळ यांनी पण सोडली आहे. पण टोकाचा विरोध मलाच का?. राणेंना भाजपमध्ये नाही घ्यायचे ,राणेला मंत्री नाही करायचे, राणेंनी निवडणूक लढवायची नाही, जर माझा शिवसेनेला एवढा राग येत असेल, तर समोर येऊन बोला. असे आव्हानही श्री. राणे यांनी दिले.

श्री. राणे म्हणाले,  शिवसेनेतून मी बाहेर पडलो कारण मला त्यांचा विचार पटला नाही. जे चालले होते ते सर्व मला त्यावेळी सहन झालं नाही. त्यावेळी 14 फेब्रुवारी रोजी शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यामध्ये मी उघड सांगितले, मी चाललो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझे प्रेम होते. त्यांना कधीच वाटले नव्हते की, नारायण राणे कधी मला सोडून जाईल, पण माझा नाईलाज होता. काम करणे अशक्य झाले होते, असेही राणे यांनी स्पष्ट केले. 

श्री. राणे म्हणाले, विनायक राऊत यांनी उद्धवला जाऊन विचारावे की ईडीकडे कोणाच्या फाईल्स पडल्या आहेत.  माझ्याबद्धल तुम्ही बोलता, हा खेळ तुम्ही सुरू केला आहे आणि मला बोलायला लावता. माझ्या रस्त्यात जर तुम्ही आलात, तर मी काय करेन हे उद्धवला चांगलेच माहिती आहे, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Narayan Rane comment