Loksabha 2019 : कोकणात सेनेच्या पाच आमदारांची सत्त्वपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

रत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महायुतीचे विनायक राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रणनीती बदलत गनिमी काव्याने प्रचार सुरू ठेवला आहे. शिवसेनेच्या गटांना आणि गणांना हादरा देण्याचा नीलेश राणे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाच आमदारांपैकी किमान तिघांची सत्त्वपरीक्षा आहे. मताधिक्‍य देण्यासाठी आमदारांचा कस लागणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारासंघापैकी देवगड काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याकडे आहे. ते, नीलेश राणे यांना निवडून देण्यासाठी झटत आहेत. शिवसेनेचे पाच आमदार ही राऊत यांची ताकद आहे.

रत्नागिरीत उदय सामंत, राजापुरात राजन साळवी आणि चिपळुणात सदानंद चव्हाण, कुडाळ-मालवणला वैभव नाईक आणि सावंतवाडी दीपक केसरकर यांच्यामुळे शिवसेनेची पकड आहे. सिंधुदुर्गमध्ये गेल्या निवडणुकीत राऊत यांना ६१ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. मात्र या निवडणुकीत उलट परिस्थिती होईल, असा अंदाज आहे. आमदार नाईक आणि केसरकर यांची अग्निपरीक्षा आहे. मतदारसंघातील प्रभाव दाखविण्यासाठी मताधिक्‍य आवश्‍यक आहे.

जिल्ह्यातील सर्वांत सुरक्षित आणि जास्तीत जास्त मताधिक्‍य देणारा मतदारसंघ आमदार उदय सामंत यांचा रत्नागिरी. चिपळूणमध्ये गेल्या निवडणुकीत अवघ्या पाच हजाराने शेखर निकम यांचा पराभव झाला होता. सदानंद चव्हाण यांना जास्तीस्त जास्त मताधिक्‍य देणे शक्‍य होईल, असे चित्र नाही. राजापूर मतदारसंघामध्ये राजन साळवी यांच्याबाबत नाराजी आहे. त्यात नाणार आणि जैतापूर या दोन्ही प्रकल्पामुळे मतांचे विभाजन झाले आहे. खासदार हुस्नबानू खलिफे यांचेही तेथे काम आहे. शहरामध्ये काँग्रेसची ताकद कायम आहे.

स्वाभिमानने सेनेची बलस्थाने शोधून तिथेच घाव घालण्याची रणनीती अवलंबली आहे. गट, गण, ग्रामपंचायती फोडण्याचे काम स्वाभिमानने सुरू ठेवले. अनेक ठिकाणी त्यांना यश आले. रत्नागिरीत स्वाभिमानने आक्रमण केले आहे.

युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड राबता आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना रत्नागिरीतून मताधिक्‍य मिळणार, असा ठाम विश्‍वास आहे.
-उदय सामंत,
आमदार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Constituency