Loksabha 2019 : राणे तरणार की हरणार; सर्वांना उत्सुकता 

अनंत पाताडे
बुधवार, 24 एप्रिल 2019

सावंतवाडी -  रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात ६४.४२ टक्के मतदान झाले आहे. सिंधुदुर्ग राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथील मतदानाने राणे तरणार की हरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे.

सावंतवाडी -  रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात ६४.४२ टक्के मतदान झाले आहे. सिंधुदुर्ग राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथील मतदानाने राणे तरणार की हरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे.

जिल्ह्यातील एकूण ६ लक्ष ६६ हजार ७२० मतदारांपैकी ४ लक्ष २९ हजार ५१४ (६४.४२ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २ लाख २१ हजार ३४३ (६६.७१ टक्के) पुरुष मतदार तर २ लाख ८ हजार १७१ (६२.१६) महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  

जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये १ लक्ष ४५ हजार ९१६ (६३.५९ टक्के) एकूण मतदान झाले. यामध्ये ७३ हजार ३५६ (६५.१३ टक्के) पुरुष मतदार, ७२ हजार ६०५ (६२.११ टक्के ) महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कुडाळ विधानसभा क्षेत्रात १ लक्ष ३७ हजार १४९ (६४.१९ टक्के) मतदान झाले असून त्यामध्ये पुरुष मतदार ७१ हजार २९१ (६७.१६टक्के) तर महिला मतदार ६५ हजार ८५८ (६१.२६ टक्के) आहेत. सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात एकूण १ लक्ष ४६ हजार ४०४ (६५.५० टक्के) मतदारांनी मतदान केले. यामध्ये मतदान केलेले पुरुष मतदार ७६ हजार ६९६ (६७.८५ टक्के), महिला मतदार ६९ हजार ७०८ (६३.०९ टक्के ) आहेत.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हात राणेंचे नेहमीच वर्चस्व राहीले आहे. याठिकाणी जिल्हा परिषद, कणकवली नगरपरिषदेसह काही नगर पंचायती, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींवर राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे २००९ च्या निवडणुकीत निलेश राणे यांना सर्वाधिक मताधिक्य येथूनच मिळाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg constituency