Loksabha 2019 : निलेश राणे प्रेमी मतदाराची अशीही नोटीस

अनंत पाताडे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सावंतवाडी - राज्यभर लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे.  उमेदवाराचे प्रचार देखील जोरदार सुरू आहेत. प्रचारासाठी कार्यकर्त्ये घरोघरी फिरताना पाहायला मिळत आहेत. या कार्यकर्त्यांना इशारा देणारी नोटीस एका मतदाराने दारावर लावली आहे. याचीच चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. तसेच सोशल मिडियातही या नोटीसीचे चित्र फिरत आहे.

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील अति दुर्गम भागांत छोट्याशा पडवणे गावात एका मतदाराने चक्क निलेश राणे यांच्या नावाचे नोटीस आपल्या दरवाजावर लावली आहे. त्यामध्ये असा उल्लेख केलाय की, निलेश राणे यांनाच इथे मत मिळेल बाकी कुठल्याही पक्षाने इथे मत मागू नये. अपमान केला जाईल. आनंद सरमळकर असे या मतदाराचे नाव आहे. घराच्या दरवाजावर  लावलेली ही नोटीस सध्या देवगड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण लोकसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरली आहे. 

निलेश राणे यांनी या गावांमध्ये चांगला विकास केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले खासदार विनायक राऊत या ठिकाणी फिरकले देखील नाहीत. त्यामुळे माझे मत एक महिना आधीच निलेश राणे यांना निश्चित झाले आहे. 

- आनंद सरमळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Constituency Nilesh Rane fan special