Loksabha 2019 : रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये बसपाने दिली यांना उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

सावंतवाडी - धनगर समाजाचे नेतृत्व घेऊन लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वेंगुर्ले येथील किशोर वरक यांना अखेर बसपाकडून उमेदवारी देण्यात आली. वरक हे उद्या (ता.3) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

सावंतवाडी - धनगर समाजाचे नेतृत्व घेऊन लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वेंगुर्ले येथील किशोर वरक यांना अखेर बसपाकडून उमेदवारी देण्यात आली. वरक हे उद्या (ता.3) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. कोकणातील धनगर समाजाने या निवडणूकीस स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वरक यांची उमेदवारीही जाहीर केली होती व त्यांच्या प्रचारासाठी सुरुवातही झाली होती; मात्र आता बसपाने धनगर समाजास उमेदवारी देवू केली आहे.

वरक यांचा उमेदवारी अर्ज भरताना धनगर व इतर सर्व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संतोष साळसकर, बबनकाका बोडेकर, बाळू कोकरे, संजय बोडेकर, संतोष बोडके, प्रकाश कोकरे, आर. बी. बोडेकर, विजय बोडेकर, बसपा जिल्हाध्यक्ष दीपक जाधव, प्रदेश सचिव आयरे यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency BSP candidate