Loksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे

संदेश सप्रे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली. 

देवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान पोरग्याकडे दुसराच झेंडा आणि मोठा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केली. 

देवरूख येथे महायुतीचे रत्नागिरी - सिंधुदुर्गातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यामध्ये श्री. ठाकरे बोलत होते. काँग्रेसवर टीका करताना श्री. ठाकरे म्हणाले, साठ वर्षे खाऊन ज्यांची पोटं भरली नाहीत, त्यांनी या देशावर केवळ दरोडे टाकण्याचे काम केले. अनेक घोटाळे केले. घोटाळ्यांची बाराखडी देखील कमी पडेल. स्वतः दरोडेखोर आणि दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय तुरूंगात आहे. हे त्यांनी विसरू नये,  असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच जयजयकार केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यावीर आणि रत्नागिरीचे नातं खुप मोठं होते. सावरकर मृत्यूंजय होते. राहूल गांधी हे नालायक कारटं, यांनी सावरकरांना डरपोक म्हणावं ? (शेम शेम च्या घोषणा), नेहरूंनी सावरकर यांच्यासारख्या हाल अपेष्टा भोगल्या असल्या तर त्यांना वीर जवाहर का नाही म्हणत. मग काय नेभळट राहूलला वीर म्हणायचे का? असा सवालही श्री. ठाकरे यांनी केला. 

स्वातंत्र्यांसाठी मेहनत करणार्‍या काँग्रेसला आम्ही मानतो. आत्ताची काँग्रेस पाहिल्यावर माना खाली जातात. सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींच नेतृत्व आजच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य आहे का? असा सवालही श्री. ठाकरे यांनी  केला. 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, खासदार विनायक राऊत, पालकंत्री रविंद्र वायकर, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, जिल्हापरिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी, देवरूख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये उपस्थित होते.

या मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या दिग्गज खासदारांची परंपरा आहे. 2009 ला ती खंडीत झाली मात्र इथल्या शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांनी ती कसर मागीलवेळी भरून काढली. याही निवडणूकीत तीच परंपरा कायम ठेवायची आहे. हा निर्धार आज प्रत्येकाने करा.

- उद्धव ठाकरे 

भाजपशी युतीबद्दल बोलताना ठाकरे यांनी, भाजपशी संघर्ष हा काही तत्वासाठी होता. ज्यावेळी भाजपध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर आले. तेव्हा त्यांना हीच गोष्ट आम्ही कानावर घातली. त्यांना आमची भूमिका पटली. त्यावेळीही आम्ही टोकाला गेलो नव्हतो म्हणूनच देशहितासाठी एकत्र आल्याचे सांगत भाजप आणि शिवसेना कायम एकत्रच राहितील अशी ग्वाही त्यांनी दिली.

निलेश राणेंवर ठाकरेंची टीका

निलेश राणेंवर टिका करताना इथल्या प्रचारात कुणीतरी शिक्षणाचा विषय काढतोय, पण शिक्षणाबरोबर संस्कार हा भाग असतो. तु परदेशात डिग्री घेतला असशिल पण संस्कार कुठे आहेत. आमचा उमेदवार तुझ्यापेक्षा कमी शिकला असेल पण तो तुझ्यापेक्षा सुसंस्कारी आणि सुशिक्षित आहे. ज्यांच्या घरात निष्ठाच नाही तो जनते बरोबर काय निष्ठावंत राहणार. याना फक्त खुर्ची हवी. त्यामुळेच हे तुमच्यासमोर आलेत पण हा कोकणी माणुस यांना परत इथेच गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

भाजपचे आमदार प्रसाद लाड, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. 

मातृपितृप्रेम हिरावलेल्या या विनायकला शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी वडिलांचे प्रेम दिले तर बंधुप्रेम उध्दव यांनी दिले. कोकणी जनतेने मला घरातील माणसासारखे प्रेम दिले. 2 हजार गावांच्या 9 हजार चौरस किमी विस्तीर्ण असणार्‍या हा मतदार संघ गेली पाच वर्षे मी पालथा घातला. गेल्या पाच वर्षात बरेच काही केले मात्र अजुनही बरेच काही करायचे आहे. 

- खासदार विनायक राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Uddhav Thackeray comment in Devrukh