esakal | Loksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात 
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात 

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी कोकणशी नाळ जुळलेली आहे.

Loksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात 

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही. मुंबईत वास्तव्याला असले तरी कोकणशी नाळ जुळलेली आहे.

गणपती, उन्हाळी सुटी व यात्रेला सर्वजण मौजे तळंगाव-राऊतआळी (ता. मालवण) येथे येतात. तेव्हा सर्वांशी मिळून मिसळून अगदी मालवणी भाषेत संवाद साधत सर्वांना आपलेसे करतात. कुटुंब प्रमुखाला निवडून आणण्यासाठी सारे कुटुंबीय पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. 
 
पत्नी- शामल विनायक राऊत 

सक्रिय राजकारणात नसल्या तरी घर सांभाळून पक्ष संघटनात्मक तसेच विशेषत: महिलांशी निगडित उपक्रमात सतत कार्यरत आहेत. राजकारणातील कोणतेही मोठे पद त्यांनी भूषविलेले नाही. मात्र, 1992 मध्ये त्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका होत्या. राजकारण व जनसंपर्काचा हा मोठा अनुभव आहे. 
 
मुलगा - गितेश विनायक राऊत 

रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. वडील विनायक राऊत यांच्या प्रचार सभांचे नियोजन, कार्यकर्त्यांना प्रचार साहित्य पुरवणे, आवश्‍यक परवानग्या घेण्याचे काम गितेश राऊत करत आहेत. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत राऊत परिवार व इतर नातेवाईकांना निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय करण्याचे काम गितेश राऊत करत आहेत. ते नियोजनाच्या बैठकांमध्ये सतत व्यस्त. कार्यकर्त्यांचा समन्वय ते ठेवतात. 
 
मुलगी - रुची विनायक राऊत 

मुंबईत बीएएमसीचे शिक्षण घेत आहे. राजकारणात सक्रिय नाही, तरीही युवा कार्यकर्ती म्हणून पुढे येण्यासाठी धडपडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान परीक्षा जाहीर झाली. अभ्यास सांभाळून वडिलांना मदत करण्यासाठी ती सतत मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास करत आहे. निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचाराचे नियोजनही पाहत आहे. 
 
सून - गिरिजा गितेश राऊत 

चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे हे त्यांचे मूळ गाव. चिपळूण तालुक्‍यातून सासऱ्यांना मताधिक्‍य मिळावे, यासाठी वडील व नातेवाईकांशी सतत संपर्क करत आहेत. गावातील व नात्यातील महिलांशी संपर्क करून प्रचाराचा आढावा त्या सातत्याने घेत असतात. 

loading image