वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी मतदानयंत्रात बिघाडाने अडथळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

वैभववाडी - लोकसभेसाठी तालुक्‍यात आज सकाळी सात वाजल्यापासुन मतदानाला सुरूवात झाली; परंतु सुरूवातीलाच मतदान यंत्रातील बिघाडामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तब्बल चार मतदान केंद्रावरील मतदान काही काळ ठप्प झाल्याने मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले. 

वैभववाडी - लोकसभेसाठी तालुक्‍यात आज सकाळी सात वाजल्यापासुन मतदानाला सुरूवात झाली; परंतु सुरूवातीलाच मतदान यंत्रातील बिघाडामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तब्बल चार मतदान केंद्रावरील मतदान काही काळ ठप्प झाल्याने मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले. 

वेंगसर मतदान केंद्रातील व्ही. व्ही. पॅट मशील बंद पडल्यामुळे मतदान प्रकिया तासभर खोळंबली. प्रत्येक बुथवर चढाओढीने मतदान सुरू आहे. काही ठिकाणी परवानगी घेताच लावलेले बुथ पोलिसांनी हटविले. प्रत्येक मतदाराला बुथपर्यंत ने-आण करण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरूवात झाली; परंतु काही ठिकाणी मतदानयंत्रेच बंद पडल्याचे चित्र होते.

नाधवडे सरदारवाडी येथे मतदान प्रकिया सुरू होताच मतदान केल्यानंतर वाजणारे बीपचा आवाज येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी धावाधाव सुरू केली. अर्ध्यातासात मशीन बदलण्यात आली. त्यानंतर तेथे मतदान प्रकिया सुरू झाली. नापणे गांगेश्‍वर शाळा मतदान केंद्रात 18 मतदारांनी मतदान केल्यानंतर मशीन बंद पडले. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तेथील मशीन देखील तासभरानंतर बदलण्यात आली. त्यानंतर तेथील मतदान प्रकिया सुरळीत झाली. 

करूळ जामदारवाडी येथील मतदानयंत्रात काही काळ बिघाड झाला होता; परंतु दहा ते पंधरा मिनिटांत पुन्हा मतदानयंत्र सुरू झाले. वेंगसर येथील व्ही.व्ही.पॅट यंत्रात बिघाड झाल्यामुळे तासाभरासाठी मतदान प्रकिया थांबविण्यात आली होती. वैभववाडीतुन गेलेल्या अधिकाऱ्यांनी व्ही.व्ही.पॅट मशीन बदलले त्यानतंर मतदानप्रकिया सुरू झाली.तासभर खोळंबा झाल्यामुळे तेथे मतदारांची मोठी गर्दी झाली होती. 

पोलिसांनी बुथ हटविले 
वैभववाडी मतदान केंद्रापासुन काही अंतरावर लावलेले बुथ पोलीसांनी हटविले. याशिवाय ज्याठिकाणी कार्यकर्त्याची गर्दी होती ती देखील पोलिसांनी पांगवली. वैभववाडी मतदान केंद्राबाहेर 11 वाजता मतदारांची रांग होती. तर काही भागात सकाळच्या सत्रात धिम्या गतीने मतदान सुरू होते. कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha2019 : EVM failure four places in Vaibhavwadi taluka