लोणेरे - आंबेत पुलावरील अवजड वाहतूक बंदी नावाला

रवींद्र पेरवे 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

लोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील पुलाखालून नदी पात्रात होणारा वाळू उपसा व पुलावरून अवजड वाळू वाहतूक सर्रासपणे होत आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

लोणेरे - रायगड जिल्ह्यातील आंबेत व रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल गावाला जोडणारा पूल हा अत्यंत धोकेदायक व कमकुवत बनला आहे. असे असतांना देखील पुलाखालून नदी पात्रात होणारा वाळू उपसा व पुलावरून अवजड वाळू वाहतूक सर्रासपणे होत आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आंबेत पुलावरून 20 टन हुन अधिक अवजड वाहतूकीला बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र ही बंदी फक्त नावापुरतीच असल्याने आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखत वाहतूक होतच आश्चर्य व्यक्त केलं जातेय. थेट सावित्री नदी पात्रात जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे या पुलावरून सायंकाळी ते रात्री पहाटे पर्यंत मोठ्या प्रमाणात ट्रक, डंपरने वाळू वाहतूक सुरू आहे. अपघात होवून देखील ही वाहतूक थांबलेली नसल्याने या भागातील नागरिक या वाहतुकीला कंटाळले आहेत. मात्र वाहतूक पोलिस फक्त वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून चिरिमीरी घेण्यात दंग असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 

दासगाव, टोळ, सापे, आंबेत, म्हाप्रल, अंजर्ले येथे सक्शन पंपाने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होते मात्र महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे वाळू वाहतूक कारण्यांना रान मोकळेच मिळते. म्हसळा, महाड, मंडणगड, दापोली येथील सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस व महसूल प्रशासन ला तक्रारी देऊन पण कारवाई होत नसल्याचे आंबेत येथील ग्रामस्थांनी सांगितले. याठिकाणी गेली तीन महिने कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता अवैध वाळू उपसा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं. 

म्हणे वाळू नाही 
सामान्य जनतेला वाळू नसल्याचे सांगितले जाते मात्र अवैधरित्या चार पट चढ्या दराने आजही वाळू विक्री सुरू आहे. रेती निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड प्रशासन करते मात्र अशा अवैधरित्या वाळू उत्खनन ला पोलिस व महसूल प्रशासन छुपा पाठिंबा देत असल्याने संताप व्यक्त केला जातोय.

महसूल व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष 
पुलाच्या दोन्ही बाजूस पोलीस चौक्या आहेत मात्र पोलिसांकडून नाममात्र कारवाई करण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नाही. 

आंबेत पुलावर 20 टन हुन अधिक वाहतूक बंदीचे फलक लावले आहेत. अवजड वाहतूक बाबत आम्ही आरटीओ पत्र दिले आहे. जिल्हाधिकारी मार्फत अवजड वाहतूक बाबत अधिसूचना जरी होईल. पुलासाठी साडे अकरा कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Lonarere - heavy traffic ban on Ambee bridge