अनाथ मुलांनी विविध क्षेत्रांत उमटवली ‘कर्तृत्वा’ची मोहोर! ; महाराष्ट्र शासनाकडून कौतुक

lorn child of balashram in rajapur success in various fields in ratnagiri
lorn child of balashram in rajapur success in various fields in ratnagiri

राजापूर (रत्नागिरी) : अनेकांच्या आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले, काहींच्या पालकांना विविध व्याधींनी ग्रासलेले, बहुतेकांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच... अशा अनेक कारणांनी अनाथ, निराधार झालेल्या अनेक मुलांना तालुक्‍यातील ओणी येथील वात्सल्य मंदिराने आधार दिला. येथील बालकाश्रमात त्यांना संस्काराचे बालकडू मिळाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनेक अनाथ मुलांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. येथील सहा मुलांना राज्य महिला व बाल विभागाने पुरस्काराने सन्मानित करीत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.

जग काय असते, याचे भान येण्यापूर्वीच काहींच्या डोक्‍यावरील आई-वडिलांचे छत्र हरपते. अशा अनाथ मुलांची ओणी येथील वात्सल्य मंदिर ही संस्था बालकाश्रमाच्या माध्यमातून आधारवड ठरली आहे. या सर्व मुलांवर डॉ. महेंद्र मोहन आणि सहकाऱ्यांनी मायेची पाखरण घातली. त्यांच्यामध्ये नव्याने जीवन जगण्याचा आणि स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचा आत्मविश्‍वास निर्माण केला. यातूनच संस्थेतील एक विद्यार्थी रसायन शास्त्रामध्ये डॉक्‍टरेट पदवी घेऊन संशोधन करत आहे. 

हेही वाचा - कोकणच्या लाल मातीत डोलले मक्याचे कणीस ; युवा शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम -

बालगृहातून बाहेर पडलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत यशस्वी कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या राज्यातील सुमारे ३३ जणांचा राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. राज्यमंत्री बच्च कडू आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केलेल्या या मुलांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी (ता. राजापूर) येथील बालकश्रमातील विजय सराटे, संजय सराटे, महेशकुमार, गाँडफ्री फर्नांडिस, अभय तेली, वैभव कोळेकर या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सत्कारमूर्तींसह डॉ. गुजर, अलोक गुजर, सुवर्णा राघव आणि ओणीच्या बालकाश्रमातील सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

सहाही विद्यार्थी उच्चशिक्षित 

महिला व बाल विभागाकडून सन्मानित केलेले सहाही विद्यार्थी सध्या ठिकठिकाणी मोठ्या पदावर काम करीत असून, सामाजिक क्षेत्रातही काम करीत आहेत. सर्वांनी उच्चशिक्षण घेऊन पीएच.डी., सरकारी सेवेत, उद्योग व्यवसाय उभारून इतरांना रोजगार देण्याबरोबरच विदेशातही झेप घेतली आहे. रत्नागिरीत पहिला सायबर कॅफे सुरू करणारा हा विद्यार्थी बालकामातीलच आहे. अभय तेली याने तर राज्य शासनाच्या एफ वन फोर्समध्ये कमांडो म्हणून कार्यरत राहून पुढे एमएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अनाथ मुलांच्या समस्या निवारण करण्यासाठी ते प्रयत्न करतात.

"महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान होणे, म्हणजे संस्थेच्या शिरपेचात रोवलेला मानाचा तुरा आहे. महाराष्ट्र शासनाने गौरव करून ‘फक्त लढ म्हणा’ असे दिलेले पाठबळ, हेच  शंभर हत्तीचे बळ निर्माण करून देणारे आहे. शासनातर्फे मुलांचा झालेला सत्कार निश्‍चितच अभिमानास्पद आहे."

- डॉ. महेंद्र मोहन
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com