
वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे, कलमे निमिर्ती हा प्रकल्प येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू केला आहे. या प्रकल्पाद्वारे कोकणातील शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक स्तर उचवण्याच्या दृष्टीने या प्रामाणिक प्रयत्न असल्याची माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत व लुपिन फाउंडेशनचे व्यवस्थापक योगेश प्रभू यांनी दिली.
यात सुरंगी, वडसोल, वावडिंग, त्रिफळ, कडीकोकम यांसारख्या कोकणामध्ये नैसर्गिक अधिवासात आजही तग धरून असणाऱ्या व व्यापारीदृष्ट्या महत्व असूनही दुर्लक्षित राहिलेल्या वनस्पतींचा अभ्यास करण्यात येणार आहे. या पिकाखाली असलेले क्षेत्र वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे.
सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने व कोकणातील समृद्ध जैव विविधतेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने या पिकांचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. कोकणातील दुर्लक्षित पिकांचे सर्वेक्षण, संग्रह, जतन व विविध अभिवृद्धी पद्धती विकसित करणे व त्याचबरोबर या पिकांची दर्जेदार रोपे निर्मिती करणे या प्रमुख उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सावंत, लुपिन फाउंडेशनचे प्रभू, वरीष्ठ शात्रज्ञ डॉ. दळवी, लुपिन फाउंडेशनचे कृषी अधिकारी प्रताप चव्हाण, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ. एम. पी. सणस, लुपीन फाउंडेशनचे संतोष कुडतरकर, कनिष्ठ संशोधन छात्र डॉ. नागेश गावडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.